नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृष्य स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:20 PM2019-08-10T12:20:08+5:302019-08-10T12:20:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 टक्के पीक पाण्याखाली गेले आहेत. शेतांमध्ये कमरेएव्हढे पाणी साचले आहे. अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 टक्के पीक पाण्याखाली गेले आहेत. शेतांमध्ये कमरेएव्हढे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांनी प्रवाह बदलल्याने शेतांनाच नाल्याचे स्वरूप आले आहे. खरीप हंगाम हाताचा गेला असून जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून पूरपरिस्थिती कमी होऊ लागली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पेरण्या सुरूच होत्या. यंदा खरीप क्षेत्राच्या जवळपास 105 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर अधीक असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांनी प्रवाह बदलल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
90 टक्के पीक पाण्याखाली
गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील 90 टक्के भागातील पीक पाण्याखाली गेले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी या पिकांना मोठा फटका बसला आहे. सातत्याने तीन ते चार फुटार्पयतच्या पाण्यात पीक राहत असल्यामुळे ते पिवळे पडण्याच्या मार्गावर आहेत. शेतांमधून पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्यामुळे पिकं सडण्याच्या मार्गावर आहेत. जे पिकं जेमतेम तग धरतील त्यांची उत्पादन क्षमता देखील कमी होणार आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे.
केसाळ अळीनंतर अतिवृष्टी
जून ते जुलै महिन्याच्या दुस:या आठवडय़ार्पयत पावसाने ताण दिला होता. यामुळे पिकांवर केसाळ व लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यापासून शेतक:यांनी जेमतेम सुटका करून घेतली तर लागलीच अतिवृष्टीने शेतक:यांना घेरले आहे.
हजारो हेक्टर शेतीचे नुकसान
जिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाल्यांनी आपला प्रवाह बदलला आहे. यामुळे ते पाणी शेतांमध्ये घुसले आहे. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर शेतांना नाल्याचेच स्वरूप आले आहे. परिणामी अशा भागातील शेतीची सुपिकता नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ओला दुष्काळाची स्थिती
जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीचा केवळ 68 टक्के पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती होती. अनेक गावे व शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. अनेक कुटूंबांनी दुष्काळामुळे स्थलांतर देखील केले होते. त्यामुळे यंदा पाऊसपाणी समाधानकारक राहो यासाठी प्रार्थना केली जात होती. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात देखील दुस:या आठवडय़ार्पयत पावसाने ताण दिल्याने जिल्हावासीयांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून पावसाने दिलेली सलामी आणि त्यानंतरची पावसाची हजेरी ओव्हरडोस देणारी ठरली. गेल्या दोन आठवडय़ात चार वेळा अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात झाली. विशेषत: घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिल्याने तेथून उगम पावणा:या व वाहत येणा:या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. जुन, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ाच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल 55 टक्के अधीक पाऊस झाला आहे. तर चार महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत जवळपास 86 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
पंचनामे सुरूच..
4 व 5 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेत शिवारातील पिकांचा पंचनामा करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु संततधार पावसामुळे ते पुर्ण होऊ शकले नव्हते. आता पुन्हा दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. आधी जेथे 50 टक्केच्या आत नुकसानीचे पंचनामे झाले होते तेथे आता पुन्हा नव्याने पंचनामे करण्याची वेळ येणार आहे. जवळपास जिल्ह्यातील 80 टक्केपेक्षा अधीक भागावर 50 टक्केपेक्षा अधीक नुकसान झाले असून त्यानुसार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी होत आहे.