ढोल, ताशांचा निनाद आणि लेझीमची लय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:33 PM2019-09-02T12:33:10+5:302019-09-02T12:33:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोमवारपासून सुरू होणा:या गणेशोत्सवासाठी नंदुरबारच्या वेगळ्या धाटणीच्या लेझीमचा सराव युवकांकडून आणि गणेशमंडळ कार्यकत्र्याकडून सुरू ...

Drums, cardio echoes and the rhythm of the lycium. | ढोल, ताशांचा निनाद आणि लेझीमची लय..

ढोल, ताशांचा निनाद आणि लेझीमची लय..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोमवारपासून सुरू होणा:या गणेशोत्सवासाठी नंदुरबारच्या वेगळ्या धाटणीच्या लेझीमचा सराव युवकांकडून आणि गणेशमंडळ कार्यकत्र्याकडून सुरू आहे. रात्री उशीरार्पयत ढोल आणि ताशांच्या निनादात लेझीमचा सराव केला जात आहे. 
 नंदुरबारातील गणेशोत्सवातील लेझीम नृत्य हे एक वेगळेच आकर्षण असते. वेगळ्या धाटणीचे लेझीम नृत्य केवळ नंदुरबारातच पहावयास मिळते. त्यासाठी खास नृत्य बसविणारेदेखील शहरात आहेत. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हे नृत्य केले जाते. त्यासाठीचा सराव सुरू झाला असून, गणेश मंडळाच्या कार्यकत्र्याची पावले लेझीमच्या तालावर थिरकू लागली आहेत. 
नंदुरबारची जशी वेगवेगळ्या संदर्भात खासीयत आहे, तसे नृत्याबाबतदेखील हे शहर प्रसिद्ध आहे. पूर्वी गणेश मेळ्यांमध्ये होणारे लेझीमनृत्य विविध तालीम संघांमध्ये स्पर्धा करणारे ठरायचे. दोन पावलीपासून 11 पावली लेझीम नंदुरबारची एक वेगळी ओळख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत     जेवढीही मंडळे सहभागी होतात ते सर्व लेझीमच खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांची ही लेझीम     नृत्य पहाण्याचीही मजा काही औरच असते. 
पूर्वीच्या लेझीमनृत्यात व आताच्या लेझीमनृत्यात बराच बदल होत गेला असून आता केवळ त्याला हुल्लडबाजीचे स्वरूप येत आहे. मात्र काही तालीमसंघ आजही लेझीमची परंपरा टिकवून आहेत. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या 15 दिवस आधीपासूनच त्याचा सराव सुरू केला आहे.
पूर्वीपासूनची परंपरा
लेझीम नृत्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी ढोल-ताशांऐवजी संभळ वाद्यावर ती खेळली जात असे. त्याची वेगळीच लय राहत होती. कालांतराने मोठे आवाज करणारे ताशे, ढोल आले. त्यांनी संभळची जागा घेतली. ढोल व ताशांच्या आवाजामुळे नृत्यात अधिकच जोश येऊ लागल्यामुळे ही वाद्ये तरुणांच्या पसंतीस उतरली आणी संभळ मागे पडले. आज प्रत्येक मंडळात कमीत कमी पाच ते सात ढोल व तेवढीच ताशे आहेत. त्यांच्या ठेक्यावर आता लेझीम खेळली जाऊ लागली आहे.
पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुका दोन ते अडीच   दिवस चालत असे. त्यामुळे मंडळातील कार्यकत्र्याचे गट करून ठरावीक वेळासाठी   ते लेझीम खेळत असत. त्यानंतर दुसरा गट   लेझीम खेळण्यासाठी उतरत असे. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या शैली पहाण्याची मजाही येत असे. आता मात्र तसे राहिले नसल्याचे चित्र आहे.

सध्या डीजे, बॅन्जोचा जमाना असला तरी नंदुरबारातील गणेश मंडळांनी पर्यायाने तालीम   संघांनी लेझीमची परंपरा मात्र टिकवून ठेवली आहे. प्रत्येक मंडळ ढोल, ताशे यांच्याशिवाय दुसरे वाद्य वाजवित नसल्याचे चित्र आहे. काही तालीमसंघांनी तर खास लेझीम पथकेही तयार          केली आहेत. या पथकांना जिल्ह्यातूनही विविध कार्यक्रमांसाठी मागणी असते. लेझीम शिकविणारेदेखील शहरात अनेकजण आहेत. त्यांच्याकडूनच गणेश मंडळ कार्यकर्ते लेझीम शिकत असतात.

लेझीम नृत्याचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी लेझीम खेळणा:या व पहाणा:यालाही मजा येत असे. त्याचे विशिष्ट व लयबद्ध स्वरूप होते. तरुणीदेखील त्यात सहभागी होत असत. आता मात्र लेझीमचे स्वरूप हुल्लडबाजीचे झाले आहे. त्यामुळे लेझीम खेळणा:या तरुणींची संख्या  नसल्यासारखीच आहे. विसर्जन मिरवणुकीत खेळण्यात येणा:या लेझीमची पद्धतही बदलत चालली आहे.परंतु काही गणेश मंडळे ही परंपरा कायम टिकवून आहेत. नंदुरबारातील नवयुवक व्यायाम शाळा व संभाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे गोफ खेळण्यात येतो. विसजर्न मिरवणुकीत या गोफचे वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे गोफचा सरावदेखील मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे.
 

Web Title: Drums, cardio echoes and the rhythm of the lycium.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.