एकाच कुटूंबातील तीन मुलींना पळवून नेल्यामुळेच युवकाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:48 PM2018-05-20T12:48:02+5:302018-05-20T12:48:02+5:30

नवानागरमुठा येथील घटना : जाब विचारणे पडले महागात

Due to the abducting of three daughters of a single family, | एकाच कुटूंबातील तीन मुलींना पळवून नेल्यामुळेच युवकाचा घात

एकाच कुटूंबातील तीन मुलींना पळवून नेल्यामुळेच युवकाचा घात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नात्यामधील तिसरी मुलगी पळवून नेल्यानंतर झालेला वाद अखेर युवकाचा जीवावर बेतला. मेवास अंकुश विहिर येथील विकास तडवी याच्यावर चिडलेल्या एकाने धारदार चाकुचा वार करून त्याला संपविले. याबाबत अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेवास अंकुश विहिर येथील विकास जेठय़ा तडवी याने नवानागरमुठा येथील नारायण गुलाब तडवी यांच्या मोठय़ा भावाच्या मुलीस पळवून नेवून लगA केले होते. काही दिवसानंतर तिला सोडून दिले. त्यानंतर या मुलीच्याच लहान बहिणीला त्याने पळवून नेले. काही दिवसांनी तिलाही तो माहेरी सोडून गेला. त्यामुळे आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर विकास याने पुन्हा नारायण तडवी यांच्या कोराई येथील नातेवाईकाच्या मुलीला पळवून नेले होते. त्याचा राग नारायण तडवी यांना होताच. विकास हा कधी भेटतो याकडे त्यांचे लक्ष होते. अखेर 17 मे रोजी विकास हा नवानागरमुठा येथे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याची माहिती नारायण तडवी यांना मिळाली त्यांनी तेथे जावून विकास याच्याशी वाद घालून ठार मारण्याची धमकी दिली होती.  
याबाबत विकास याने विनोद फत्तेसिंग तडवी यांना ही बाब सांगितली. त्याचा जाब विचारण्यासाठी विनोद व विकास हे नारायण तडवी यांच्याकडे गेले. तेथे त्यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात नारायण तडवी यांनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार जामीयाने अर्थात चाकुने विकास याच्यावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. 
याबाबत विनोद फत्तेसिंग तडवी यांनी अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिल्याने नारायण तडवी यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Due to the abducting of three daughters of a single family,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.