कवठळ येथे सुनेच्या सतर्कतेमुळे वृद्ध सासूवरील अतिप्रसंग टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:20 PM2018-09-15T12:20:56+5:302018-09-15T12:21:07+5:30

Due to the alertness of the hearing at Kawathal, the overcrowding of the aged mother-in-law was avoided | कवठळ येथे सुनेच्या सतर्कतेमुळे वृद्ध सासूवरील अतिप्रसंग टळला

कवठळ येथे सुनेच्या सतर्कतेमुळे वृद्ध सासूवरील अतिप्रसंग टळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शौचास गेलल्या 70 वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रय} सुनेच्या सतर्कतेमुळे टळल्याची घटना कवठळ, ता.शहादा 13 रोजी दुपारी घडली. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत युवक गावातीलच रहिवासी असून त्याच्याविरुद्ध शहादा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कवठळ परिसरात संताप व्यक्त होत आहे.
हिलाल दिपा ठाकरे, रा.कवठळ, ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. गावातील 70 वर्षीय वृद्धा शौचासाठी गावाबाहेरील झाडाझुडपात गेली असता हिलाल ठाकरे याने वृद्धेला उचलून नेत जवळच्या झोपडीत नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रय} केला. त्याचवेळी वृद्धेची सुन तेथे पोहचल्याने अनर्थ टळला. वृद्धेची सून तेथे आल्याचा राग येवून हिलाल याने सुनेला देखील धक्काबुकी करीत शिविगाळ केली. याबाबत वृद्धेच्या सुनेने शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने हिलाल दिपा ठाकरे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आह़े  
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरिक्षक एस.एस.शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार रमेश पवार करीत आहे.

Web Title: Due to the alertness of the hearing at Kawathal, the overcrowding of the aged mother-in-law was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.