अरबी समुद्राकडील वा-यांमुळे नंदुरबारातील आद्र्तेत 24 टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:04 PM2018-05-31T13:04:59+5:302018-05-31T13:04:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जसजसा मान्सून जवळ येतोय तसे वातावरणात मोठे बदल होताना दिसत आह़े बुधवारी आद्र्रतेत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ होऊन ती 55.6 टक्क्यांवर जाऊन पोहचली़ तर तापमानात मात्र दोन अंशांनी घट बघायला मिळाली़ बुधवारी तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल़े
अरबी समुद्राकडून येणा:या वा:यांमुळे आर्द्रतेत वाढ होत असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े तसेच वातावरण अंशत: ढगाळ राहणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े 10 जूनर्पयत नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात तापमानापेक्षा आर्द्रतेचा प्रभाव जास्त राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आल़े मान्सून केरळात दाखल झाला आह़े 6 ते 7 जूनर्पयत तो मुंबईसह कोकणात दाखल होणार आह़े वेळेआधीच मान्सून मराठवाडय़ात दाखल झाला असल्याने वातावरणात कमालीचे बदल जाणवत आहेत़ आद्र्रतेमुळे मान्सूनचे वेध लागण्यास सुरुवात झाली असली तरी यामुळे उकाडय़ात कमालीची वाढ झाली आह़े यंदाच्या मोसमात सर्वाधिक आद्र्रता मे महिन्याच्या सुरुवातीला 31 टक्के इतकी होती़
परंतु बुधवारी हा उच्चांक मोडीत काढत आद्र्रता तब्बल 24 टक्क्यांनी वाढून 55.6 टक्के इतकी नोंदविण्यात आली आह़े
हवेतील पाण्याच्या अंशाला आद्र्रता असे म्हणतात़ हवेत पाण्याचा अंश जेवढा जास्त तेवढी आद्र्रता जास्त नोंदविण्यात येत असत़े तसेच आद्र्रता जेवढी जास्त तेवढा उकाडा जाणवत असतो़
त्यामुळे अरबी समुद्रालगत असलेल्या मुंबई तसेच कोकण परिसरात सर्वसाधारणपणे आद्र्रतेचे प्रमाण सर्वाधिक असत़े सर्वसाधारणपणे समुद्री भागात आद्र्रतेचे प्रमाण अधिक असत़े
त्यामुळे समुद्राकडून वाहून येणारे वारे साहजिकच आपल्यासोबत आद्र्रतासुद्धा घेऊन येत असतात़ त्यामुळे अरबी समुद्राकडून येणा:या वा:यांचा प्रभाव सध्या मराठवाडय़ासह खान्देशात वाढत असल्याने साधारणत: 10 जूनर्पयत वातावरणात आद्र्रता कमी-अधिक प्रमाणात कायम राहणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े बुधवारी संपूर्ण खान्देशचा विचार करता सर्वाधिक आर्द्रता ही नंदुरबारात नोंदविण्यात आली आह़े जळगाव व धुळे येथे अनुक्रमे 37.6 व 35 टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली आह़े त्यामुळे बुधवारी नंदुरबारकरांना सर्वाधिक उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला़ वाढत्या उकाडय़ाने कधी एकदा पावसाळा लागतोय अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होतेय़सध्या नंदुबारात ताशी 29 प्रती कि.मी. वेगाने वारे वाहत आहेत़ रात्रीच्या वेळी वा:यांचा वेग जास्त आह़े त्यामुळे मध्यरात्री काहीशी आल्हाददायक थंडी जाणवत असल्याचा अनुभव नागरिक सांगतात़ दरम्यान, मान्सून जवळ येत असल्याने मान्सून येईर्पयत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे नंदुरबारसह खान्देशातील तापमानसुद्धा ब:यापैकी स्थिर राहणार आह़े तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यतासुद्धा कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबारातील तापमान 40 ते 42 अंशावर स्थिर राहणार आह़े