दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:23 PM2019-07-10T12:23:15+5:302019-07-10T12:25:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणा:या चांदसैली घाटात आठवडय़ाभरापासून सुरू असणा:या पावसामुळे दरडी कोसळण्यास सुरुवात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणा:या चांदसैली घाटात आठवडय़ाभरापासून सुरू असणा:या पावसामुळे दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. दरडी कोसळल्यामुळे घाटमार्गात दगड-माती पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
चांदसैली घाट हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळण्याची समस्या निर्माण होत असते. गेल्या आठवडय़ाभरापासून सातपुडय़ाच्या पर्वत रांगेत पाऊस हजेरी लावत आहे. पावसामुळे चांदसैली घाटात नेहमीप्रमाणे दरडी कोसण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम घाटातील वाहतुकीवर झाला आहे. तीव्र चढाव व उतारावर दरडी कोसळल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी शेतातील व रस्त्या शेजारील चारीची माती रस्त्यावर पसरल्याचे दिसून येत आहे.
दरडी कोसळल्याने कोठार ते धडगाव रस्त्यावरील घाट मार्गात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात दगड व मातीचा खच पसरला आहे. जोपयर्ंत मोठी दरड कोसळून घाटमार्गातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत नाही तोर्पयत लहान-लहान कोसळलेल्या दरडीचे दगड व मातीदेखील हटविण्यात येत नाही. या रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे लहान-मोठे दगड अपघात घडू नये म्हणून अनेकदा वाहनधारकच आपली वाहने उभी करून हटवितांना दिसून येतात. रस्त्यावरील दगड व माती वेळीच न हटविल्याने पावसाच्या सुरू असलेल्या रिपरिपमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
नागमोडी वळणे, खोल दरी, अरुंद रस्ता यामुळे चांदसैली घाटत वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे पसरलेल्या दगड, माती व चिखलामुळे घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे. तीव्र चढाव व उतारावर असणारा चिखल हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरू पाहात आहे. या चिखलामुळे दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे तर चारचाकी वाहनांनादेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाट मार्गात प्रशासनाकडून दरडी कोसळू नयेत म्हणून थातुरमातुर उपाययोजना करण्यात येतात. मात्र पहिल्याच पावसाळ्यात या उपाययोजनांची पोलखोल झालेली दिसून येत आहे. दरम्यान, घाटात दरडी कोसळल्यामुळे रस्त्यावर पसरलेले दगड व माती तात्काळ हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी घाटामार्गात पावसाळ्यात कायमस्वरूपी एक जेसीबी प्रशासनाकडून तैनात असायला हवे. जेणे करून घाटात दरड कोसल्यास ती त्वरित रस्त्याच्या बाजूला करण्यास मदत होऊन या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहील.