धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान काँक्रिटीकरणामुळे वाहतूक वळवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:38 PM2019-07-04T12:38:30+5:302019-07-04T12:38:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून एक किलोमीटर अंतरात काँक्रिटीकरणास मंजूरी देण्यात आली आह़े ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता़
धुळे चौफुलीपासून दोंडाईचाकडे जाणा:या रस्त्यावर भोणे फाटा ते मुस्लिम कब्रस्तान या अंतरात मोठमोठे खड्डे पडून वाहतूकीला अडचणी येत होत्या़ खड्डय़ांमुळे दुचाकींचे अपघात नित्याचे झाले होत़े यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी डागडुजी करुन रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले होत़े परंतू कालांतराने पुन्हा खड्डे निर्माण होऊन अपघात वाढत होत़े पावसाळ्यात खड्डय़ांमध्ये पाणी साचून मोटारसायकली आणि चारचाकी वाहनांचे गंभीर अपघात घडले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन नागरिकांची समस्या मांडली होती़
दरवर्षी होणा:या या प्रकारांना आळा घालण्यासाठी नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून भोणे फाटा ते कब्रस्तानर्पयत काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले होत़े यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण करुन या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आह़े निधी उपलब्धतेनंतर हे काम तात्काळ सुरु होणार असून यासाठी नियोजित मार्गावरील वाहतूक वळण्याबाबत बांधकाम विभाग इतर विभागांच्या अधिका:यांसोबत समन्वय साधत आहेत़
या मार्गाने येणारी वाहने भोणे फाटा-राजपूत प्रेठोलपंप ते धुळे चौफुली या मार्गाने शहरात सोडण्याचे नियोजन करण्यात येत आह़े यात एसटी बसेस, अवजड वाहने, स्कूल बस, खाजगी आराम बस, खाजगी चारचाकी वाहने यांचा समावेश राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े