खरडी नदीवरील पूल ठरतोय धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:27 PM2017-11-05T13:27:07+5:302017-11-05T13:27:07+5:30
तळोदा : दोन्ही कठडे नसल्याने शहरातील वाहतुकीला धोका
Next
ल कमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील खरडी नादीवरील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पुलाचे दोन्ही कठडेदेखील नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी अक्षरश: धोकेदायक ठरला आहे. सबंधीत यंत्रणेने या प्रकरणी गंभीरदखल घेवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आहे.तळोदा शहरातील खरडी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी पूल उभारला आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापासूनचा हा पूल आहे. परंतू बांधल्यापासून तर अद्यापपावेतो त्याची एकदाही दुरुस्ती अथवा डागडूजी झालेली नाही. त्यामुळे या पुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. तसेच ठिक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. एवढेच नव्हे तर दोन्हीं बाजूचे कठडे सुध्दा तुटले आहे. त्यामुळे पुलावरची वाहतूक अक्षरश: धोकेदायक बनली आहे. याठिकाणी कठडे नसल्यामुळे येथून वाहन काढत असताना पादचा:यांना जीव मुठीत घेवून मार्गक्रमण करावे लागत असते. शिवाय याठिकाणी वाहनचालक ही बेदकारपणे वाहने चालवित असतात. अशावेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नकारता येत नाही. तीन दिवसापूर्वी येथून दोन भरधाव वेगातील चारचाकी वाहने निघत असतांना पूलाखाली पडताना वाचल्याचे प्रत्यक्ष दर्श्ीनी सांगितले. वास्तविक हा अत्यंत जूना पूल झाला असून, सबंधित यंत्रणेने स्ट्ररल ऑडिटदेखील केले आहे. मात्र अजून ही त्याची नूतनीकरण, दुरुस्ती अथवा डागडूजीबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. संबंधित विभागाच्या उदासीन धोरणाबाबत येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या पलीकडे आदिवासी वसाहत आहे. या नागरिकांना पूला वरुनच ये-जा करावी लागत असते. शिवाय अक्कलकुवा रस्त्याकडे जाणारी चारचाकी वाहने या पूला वरुनच जात असतात. त्याच बरोबर शेतकरी ही जातात. साहजिकच पूलावर वहनानांची मोठी वर्दळ होत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पूलाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परंतू याकडे लोकप्रतिनीधींनी सुध्दा दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. निदान सबंधित विभागाने रायगड येथील सावित्री पूलाची दुर्घटना टाळण्यासाठी या पूलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे