उत्पादनात 25 टक्क्यांनी घट येण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:49 PM2018-08-20T13:49:21+5:302018-08-20T13:49:31+5:30

पावसाची 15 ते 17 टक्के तूट : नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुव्यात बिकट स्थिती

Due to the decline in production by 25 percent | उत्पादनात 25 टक्क्यांनी घट येण्याची भिती

उत्पादनात 25 टक्क्यांनी घट येण्याची भिती

Next

नंदुरबार : दोन तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली तरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या भागात उत्पादकता 20 ते 25 टक्यांनी घटनार आहे. येत्या काळात देखील समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईचाही सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील नवापूर व धडगाव तालुका वगळता इतर तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही ठणठणाट आहे.  दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही 15 ते 17 टक्के पावसाची तूट कायम आहे.  
गेल्या आठवडय़ात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे पावसाची सरासरी 50 टक्केच्या वर गेली आहे. सरासरी वाढली असली पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याची स्थिती आहे. विशेषत: नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टय़ाच्या भागात बिकट परिस्थिती आहे. 
पिकांची वाढ खुंटली
नंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यांमध्ये आणि अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीवरील भागात अपेक्षीत पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतक:यांमध्ये चिंता वाढली आहे. मका, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्यांनी घट येण्याची शक्यता आहे. येत्या काळातही पाऊस न आल्यास कापूसला मोठा फटका बसणार आहे. 
चार तालुक्यांची सरासरी कमी
एकुण पावसाच्या सरासरीच्या तुलनेत नंदुरबार, शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पावसाची सरासरी 10 ते 25 टक्क्यांनी कमी आहे. नंदुरबार तालुक्यात सरासरी  41 टक्के पाऊस झाला आहे. येथे जवळपास 15 टक्के पावसाची तूट आहे. शहादा तालुक्यात सरासरीचा 47 टक्के पाऊस झाला आहे. येथे 17 टक्के तूट आहे. तळोदा तालुक्यात 50 टक्के पाऊस झाला आहे. येथे सरासरी तूट 12 टक्के आहे. अक्कलकुवा तालुक्यात 47 टक्के पाऊस झाला आहे. येथे तूट 14 टक्के आहे. नवापूरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुट जवळपास भरून निघाली आहे. तर धडगाव तालुक्यात 70 टक्के पाऊस होऊन येथे सरासरीच्या तुलनेत पाच ते सात टक्के अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. 
 अवघा 36 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा 36 टक्के पाणीसाठा आहे.  37 लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये थेंबभरही पाणी नाही तर दहा प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी केवळ रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. शिवण प्रकल्पात 19 टक्के तर दरा 80 व राणीपूर 60 टक्के भरले आहेत.
जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील प्रमाणे : हळदाणी 63 टक्के, खडकी सहा टक्के, खेकडा 76 टक्के, खोकसा 97 टक्के, मेंदीपाडा 20 टक्के, मुगधन 57 टक्के, नावली तीन टक्के, रायंगण, 80, सोनखडकी 23, सुलीपाडा 13, विसरवाडी 74, आंबेबारा 34, धनीबारा 30, खोलघर 28, कोकणीपाडा 5, पावला 5, शनिमांडळ 3, शिरवाडे 62, ठाणेपाडा 2- 15, ठाणेपाडा1- 5 , वासदरा 0, वसलाय 32, वावद 0, दुधखेडा 21, खापरखेडा 35, कोंढावळ 26, लगंडीभवानी 5, लोंढरे 8, राणीपूर 62, शहाणे 17, खडकुना 75, गढावली 0, महुपाडा 22, पाडळपूर 25, रोझवा 22, सिंगसपूर 58, उमराणी 27 टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो आहे. विरचक प्रकल्पात 20 टक्के पाणीसाठा झाला आहे. 
दरा प्रकल्पात 82 टक्के पाणीसाठा आहे.
 

Web Title: Due to the decline in production by 25 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.