19 विभागांच्या उदासिनतेमुळे वृक्षारोपणात जिल्ह्याची पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:36 PM2019-09-02T12:36:06+5:302019-09-02T12:36:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने राज्यात पहिल्या 10 जिल्ह्यात स्थान ...

Due to the depression of 19 divisions the district lags behind in the plantation | 19 विभागांच्या उदासिनतेमुळे वृक्षारोपणात जिल्ह्याची पिछाडी

19 विभागांच्या उदासिनतेमुळे वृक्षारोपणात जिल्ह्याची पिछाडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने राज्यात पहिल्या 10 जिल्ह्यात स्थान मिळण्याचे नंदुरबार जिल्ह्याचे स्वपA 19 विभागांच्या उदासनितेमुळे भंग पावले आह़े 57 पैकी 19 विभागांनी वृक्षारोपणच केलेले नसल्याने त्यांच्यासाठी तयार झालेल्या खड्डय़ांचा खर्चही वाया जाण्याची चिन्हे आहेत़        
1 जुलैपासून राज्यासह जिल्ह्यात वृक्षारोपणाचा वाजागाजा सुरु झाला होता़ गत दीड महिन्यात जिल्ह्यात 78 लाख झाडे लावत राज्यातील पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये स्थान पटकावले होत़े परंतू गत 15 दिवसात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मागे पडला असून 19 शासकीय विभागांना दिलेले ‘टारगेट’ पूर्ण करणेच जमलेले नसल्याने जिल्ह्याची दोन क्रमांकांनी घसरण झाली आह़े विशेष म्हणजे शेजारील धुळे जिल्ह्याने राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान मिळवले आह़े 
जिल्ह्यासाठी यंदा शासनाने 94 लाख 98 हजार झाडांच्या लागवडीचे उद्दीष्टय़ दिले होत़े यासाठी 94 लाख 75 हजार खड्डे खोदण्यात आले होत़े वनविभागाच्या रोपवाटिकांमधून विविध 57 शासकीय विभागांना ही रोपे देण्याचे निर्धारीत केले होत़े यानुसार दीड महिन्यार्पयत सुरळीत कामकाज सुरु होत़े परंतू काही विभागांनी खातेही न उघडल्याचे स्पष्ट झाले आह़े गेल्या दीड महिन्यात तब्बल 1 लाख 15 हजार 8 शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी, बँकांचे अधिकारी कर्मचारी, एसटीचे कर्मचारी, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या सहभागातून 85 टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली होती़ परंतू गत 15 दिवसात हा सहभाग कमी होऊन जिल्ह्यातील वृक्ष लागवड 1 टक्क्यानेच वाढल्याचे चित्र दिसून आले आह़े 

जिल्ह्यात आजअखेरीस 81 लाख 76 हजार 894 झाडांची आजअखेरीस लागवड पूर्ण झाली आह़े यात वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांनी 100 टक्के उद्दीष्टय़पूर्ती केल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू सोबतच्या कृषी विभागाने मात्र आजअखेरीस केवळ 1 लाख 74 हजार 648 झाडेच लावल्याचे स्पष्ट झाले आह़े या विभागाला तीन लाख झाडे लावण्याचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े एकीकडे कृषी विभाग 50 टक्के कामात अडखळल्यानंतर काही विभागांनी खातेही उघडलेले नाही़ यात जलस्त्रोत विभाग, कामगार विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, गृहनिर्माण विभाग, मध्यरेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगरपालिका, दुग्धोत्पादन विभाग, व्हीजेएनटी आणि ओबीसी कल्याण, पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि  वस्त्र, रेशीम उद्योग महामंडळ आणि अल्पसंख्याक विकास विभाग यांचा समावेश आह़े सहका आणि पणन विभागाला यंदा 13 हजार झाडांचे उद्दीष्टय़ होत़े त्यांच्याकडून 10 दिवसांपूर्वी 1 हजार 852 झाडे लावल्याचा अहवाल दिला गेला होता़ परंतू नुकत्याच प्राप्त आकडेवारीनुसार त्यांनी 10 हजार झाडे पूर्णपणे लावल्याचे सांगण्यात आले आह़े दुसरीकडे क्रीडा विभागाला 3 हजार 950 झाडांचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े पैकी त्यांनी केवळ 95 झाडेच लावली असल्याचे समोर आले आह़े 

जिल्ह्यातील 952 गावांसाठी निर्माण करण्यात आलेल्या 586 ग्रामपंचायतींमध्ये 19 लाख 4 हजार 600 झाडे लावण्याची अपेक्षा होती़ परंतू गेल्या दोन महिन्यात ग्रामपंचायतींमच्या हद्दीत केवळ 10 लाख 2 हजार 20 झाडेच लागली आहेत़ विशेष म्हणजे ग्रामपंचायतींसाठी 19 लाख 50 हजार 800 खड्डे खोदले गेले आहेत़ केवळ एक झाडे लागल्याने उर्वरित खड्डय़ांचे काय असाही प्रश्न आह़े काही गावांमध्ये खड्डे खोदले किंवा कसे, याचीही माहिती घेण्याची गरज आह़े या खड्डय़ांचे जिओ टॅगिंग झाले किंवा कसे याचीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही़ येत्या महिनाभरानंतर वृक्षारोपण कार्यक्रमांचा समारोप होणार आह़े जिल्ह्यात सध्या महामार्ग विस्तारीकरणाची कामे सुरु आहेत़ यात महामार्ग प्राधिकरणने एकही झाड न लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Due to the depression of 19 divisions the district lags behind in the plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.