चर्चा फिस्कटल्याने पपईचा दराचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:33 PM2018-12-12T12:33:45+5:302018-12-12T12:33:49+5:30

पपईचा दराचा तिढा : शेतक:यांचे नुकसान, व्यापा:यांचा दरवाढीला नकार

Due to the discussion, the papaya rate remained constant | चर्चा फिस्कटल्याने पपईचा दराचा तिढा कायम

चर्चा फिस्कटल्याने पपईचा दराचा तिढा कायम

Next

शहादा : पपईचा दर ठरविण्यासाठी मंगळवारी येथे व्यापारी, शेतकरी           व पपई संघर्ष समितीची बैठक  झाली. मात्र पपई दरवाढीबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने ही बैठक फिस्कटली. त्यामुळे भविष्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून शेतक:यांनी योग्य दर मिळवण्यासाठी पपई तोड बंद केली. दरवाढीवर काहीतरी तोडगा निघण्याची चिन्हे होती. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतक:यांनी पपई तोड बंद केली आहे. त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक नुकसान होत असून पपईचे पीकही खराब होण्याची शक्यता आहेत. त्या पाश्र्वभूमीवर  पपईचे दर ठरविण्यासंदर्भात मंगळवारी दुपारी येथे पपई संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी व व्यापा:यांची बैठक बोलावली होती. परंतु व्यापा:यांनी ठरलेला आठ रुपये भावापेक्षा पावणे दोन रुपये भाव कमी करून सव्वा सहा रुपये भाव देण्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्यात भविष्यात संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. 
शेतक:यांना व्यापारी अॅडव्हान्स पैसे देतात. जर दोन दिवसात व्यापा:यांनी भाववाढीबद्दल निर्णय घेतला नाही तर दोन दिवसानंतर शेतक:यांनी पपई कापून व्यापा:यांच्या घरापुढे फेकून द्या व होणा:या नुकसानीला व्यापारी जबाबदार राहतील, अशी भूमिका शेतकरी संघटनेकडून मांडण्यात आली. व्यापा:यांनी शेतक:यांची नुकसान भरपाई भरून दिली नाही तर व्यापा:यांना जिल्ह्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रात पपई विकत घेण्यासाठी फिरू देणार नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी केले. 
बैठकीला घनश्याम चौधरी, नथू पाटील, सचिन पाटील, रवींद्र पाटील, वसंत पाटील, गणेश पाटील, पमन पाटील, योगेश पाटील, विजय पाटील, कृष्णदास पाटील, ईश्वर चौधरी, अनिल गोपाळ पाटील, गणेश पाटील, र}दीप पाटील उपस्थित होते.
 

Web Title: Due to the discussion, the papaya rate remained constant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.