दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 40 टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:15 PM2018-12-07T12:15:22+5:302018-12-07T12:15:25+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 ...

Due to drought conditions, only 40% of the saplings are completed in Nandurbar district | दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 40 टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 40 टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

Next

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 टक्के पेरणी नंदुरबार तर सर्वाधिक 146 टक्के रब्बी पिकांच्या पेरण्या अक्कलकुवा तालुक्यात झाल्या आहेत़
जिल्ह्यात यंदा पावसाने लावलेल्या अल्प हजेरीमुळे तीन तालुक्यात दुष्काळ तर 1 तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती आह़े तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दोन मंडळातही नुकताच दुष्काळ जाहिर करण्यात आला आह़े खरीपात उत्पादनच हाती न आल्याने अनेक शेतक:यांमध्ये औदासिन्य आह़े यातच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यात डिसेंबर्पयत सरासरी 70 टक्के पेरण्या पूर्ण होतात़ परंतू यंदा केवळ 40 टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात 1 हजार 165, नवापूर 6 हजार 642, शहादा 7 हजार 325, तळोदा 3 हजार 536, अक्कलकुवा 3 हजार 104 तर धडगाव तालुक्यात 3 हजार 665 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार केवळ 13 टक्के रब्बी पिके असल्याने येथील दुष्काळाची वास्तवता समोर येत आह़े
जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि मका या तीन पिकांना प्राधान्य दिले जात़े यंदाच्या हंगामात आजअखेरीस नंदुरबार 566, नवापूर 3 हजार 247, शहादा 2 हजार 108, तळोदा 943, अक्कलकुवा 25 तर धडगाव तालुक्यात 860 हेक्टर असा एकूण 7 हजार 749 हेक्टर गहू पेरण्यात आला आह़े जिल्ह्यात रब्बी हंगामात किमान 21 हजार 123 हेक्टवर गहू पेरा होण्याची अपेक्षा असत़े परंतू ही अपेक्षा केवळ 37 टक्केच पूर्ण होऊ शकली आह़े
दुसरीकडे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रही खालावले असून नंदुरबार तालुक्यात केवळ 10, नवापूर 1 हजार 103, शहादा 1 हजार 198, तळोदा 742, अक्कलकुवा 2 हजार 170 तर धडगाव तालुक्यात 20 हेक्टर अशी एकूण 5 हजार 243 हेक्टर ज्वारी पेरणी झाली आह़े यासोबत 1 हजार 848 हेक्टर मका पेरणी पूर्ण करण्यात आली आह़े गेल्या काही वर्षात शेतक:यांच्या पसंतीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून पेरणीला सुरुवात होणारा हरभराही निम्मेच ठिकाणी दिसून येत आह़े 
सर्वसाधारण 20 हजार हेक्टरक्षेत्रापैकी केवळ 10 हजार 339 हेक्टर हरभरा पेरणी झाली असून नंदुरबार तालुक्यात केवळ 581 क्षेत्रात हरभरा पेरणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यंदा दाळवर्गीय आणि तेलवर्गीय पिकांची स्थिती कमकुवत झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Due to drought conditions, only 40% of the saplings are completed in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.