खर्दे खुर्द गावाला दुष्काळाची झळ 15 दिवसातून एकदाच ठिबकतो नळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:49 PM2019-05-27T12:49:44+5:302019-05-27T12:49:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खर्दे खुर्द : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असून या ग्रामीण जनता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खर्दे खुर्द : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असून या ग्रामीण जनता होरपळत आह़े खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथेच पाण्याच्या तिन्ही विहिरी पूर्णपणे कोरडय़ा झाल्या असून 15 दिवसांतून एकदा नळाला येणारे पाणीही पुरेसे ठरत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत़
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेवर खर्दे खुर्द हे साधारण 2 हजार लोकसंख्येचे गाव आह़े शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावाला पाणीटंचाई नित्याची आह़े लगतच्या धुळे जिल्ह्यातील मालपूर गावात उभारलेल्या अमरावती प्रकल्पातून पाणी मिळणार अशी भाबडी अपेक्षा गेल्या 10 वर्षापासून बाळगत येथील शेतकरी शेती करत आहेत़ गेल्यावर्षी खरीप हंगामात पावसाअभावी पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होत़े गत खरीप हंगामातील हे दुष्टचक्र यंदाचा खरीप हंगाम येऊनही कायम आह़े यात आता पाणीटंचाई मोठी भर घालत असून पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत़ खर्दे खुर्द ग्रामपंचायतीने अमरावती नदीजवळ, गावस्मशानभूमी आणि गावाच्या बाहेर अशा तीन विहिरी खोदून गावासाठी पाणी पुरवठा केला होता़ परंतू चार महिन्यांपूर्वी या तिन्ही विहिरी पूर्णपणे आटल्या होत्या़ यावर मात करण्यासाठी प्रशासनाने गावातील एका शेतक:याची कूपनलिका अधिग्रहीत केली आह़े परंतू त्यात पाणीच नसल्याने 2 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा सुरु आह़े हे पाणीही 10 ते 15 मिनीटांच्यावर सुरु राहत नसल्याने पाण्यासाठी महिला आणि पुरुषांची शेतशिवारात वणवण सुरु होत आह़े