पावसाळ्यातच नंदुरबारात दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:27 PM2018-09-29T12:27:10+5:302018-09-29T12:27:16+5:30
लहान शहादे/खोडसगाव : विहिरी पडल्या कोरडय़ा, पिण्याच्या पाण्याचेही हाल
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगावसह लगतच्या परिसरात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीही ग्रामस्थांना इतरत्र भटकंती करावी लागत आह़े
खोडसगाव गावाची परिस्थिती तर अतिशय भयंकर असून या ठिकाणी विहिरी पूर्णपणे कोरडय़ा पडलेल्या आहेत़ सर्वाधिक कमी पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात झाली आहेत़ त्यातल्या त्यात नंदुरबारातील पूर्व भागात अधिकच दैनिय परिस्थिती आह़े त्यामुळे साहजिकच पावसाळ्यातसुध्दा पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने ही परिस्थिती म्हणजे पुढील काळातील दुष्काळी स्थितीचीच धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आह़े
पावसाळ्याचा कालावधी पूर्ण झाला आह़े काहीच दिवसात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आह़े त्यामुळे यंदाचा पावसाळा शेतक:यांना निराश करणारा ठरला आह़े परतीच्या पावसावरच येथील जलस्त्रोत अवलंबून असल्याचे दिसून येत आह़े
नंदुरबार तालुक्यात आतार्पयत केवळ 376.3 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आह़े नवापूर तालुक्यात 628 मीमी, तळोदा तालुक्यात 513 मीमी, अक्कलकुवा तालुक्यात 633 मीमी, शहादा तालुक्यात 453 मीमी, अक्राणी तालुक्यात 641 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच पावसाच्या दृष्टीने नंदुरबार तालुका सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आह़े
पिकेही आले धोक्यात
पावसाने पाठ फिरविल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पिक धोक्यात आलेली आहेत़ पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े काही पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहेत, तर काही पिक पाण्याअभावी जळाली आहेत़ पपई, मिरची, कापूस आदी पिक वाचविण्यासाठी शेतकरी विहिरींचे खोलीकरण करीत आहेत़ परतीचा पाऊस समाधानकारक झाल्यास शेतक:यांचे पुढील नुकसान टळण्याची शक्यता आह़े
भयंकर दुष्काळी स्थिती
परिसरातील गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पुढील उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े येथील लघुप्रकल्पांमध्येही ठणठणाट आह़े या ठिकाणी पाण्याच्या शोधात युवकांना आपली रोजंदारीही बुडवावी लागत आह़े लगतच्या गावातदेखील पाण्याची टंचाई असल्याने लांबवरुन वाहनांव्दारे पाणी आणावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आह़े