कर्मचारी संपामुळे नंदुरबारातील शासकीय संकुल पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:18 PM2018-08-08T18:18:46+5:302018-08-08T18:20:03+5:30

अडीच हजार कर्मचा:यांकडून कामबंद : महसूल कर्मचा:यांचा तीन दिवसीय संप

Due to the employees' collapse, the government complex of Nandurbar fell | कर्मचारी संपामुळे नंदुरबारातील शासकीय संकुल पडले ओस

कर्मचारी संपामुळे नंदुरबारातील शासकीय संकुल पडले ओस

Next

नंदुरबार : जिल्हा परिषदेतील तब्बल 449 ,जिल्हा परिषदेतील दीड हजार तसेच शासकीय विभागातील 500 अशा अडीच हजार कर्मचा:यांनी संपात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय संकुले ओस पडली होती़ कर्मचा:यांनी सकाळी कामबंद करत कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर धरणे देत मागण्यांचा एल्गार केला़  
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राजपत्रित महासंघ, तलाठी महासंघ, राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांनी सातव्या वेतन आयोगाला लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आह़े तीन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आल़े संपात वाहनचालकही सहभागी झाल्याने प्रशासनातील सर्वच अधिकारी पायी किंवा त्यांच्या खाजगी वाहनाने कार्यालयार्पयत आले होत़े आरोग्य कर्मचा:यांनी संपाला पाठिंबा देत कामकाज सुरू ठेवल्याने आरोग्य सेवेवर पडणारा ताण कमी झाला़ शाळा आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीतसेच वीज कर्मचा:यांनी पत्रक काढून संपाला पाठिंबा देत कामकाज सुरू ठेवले होत़े महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचा:यांनी मात्र या राज्यव्यापी संपात 100 टक्के सहभाग दिल्याने कार्यालयांमधील कामकाज होऊ शकलेले नाही़ कंत्राटी कर्मचा:यांवर यातून भार वाढला होता़ महसूल विभागातील 555 पैकी 449 अधिकारी आणि कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला़ यात जिल्हाधिकारी कार्यालयातील 100 पैकी 70, उपविभागीय कार्यालय नंदुरबार येथील 12 पैकी 10, शहादा उपविभागीय कार्यालयाचे 9 पैकी 4, तळोदा उपविभागीय कार्यालयातील 13 पैकी 11 अशा 34 पैकी 25 कर्मचा:यांनी संपात सहभाग नोंदवला़ 
नंदुरबार तहसीलच्या 90 पैकी 79, नवापूर  67 पैकी 60, शहादा 100 पैकी 78, तळोदा 60 पैकी 58, अक्कलकुवा 65 पैकी 44 तर धडगाव तहसील कार्यालयातील 39 पैकी  35 अशा एकूण 354 कर्मचा:यांनी संपात सहभाग नोंदवला होता़ महसूल विभागातील 555 पैकी केवळ 93 अधिकारी आणि कर्मचारी कामांवर हजर होत़े संपकरी कर्मचा:यांनी कार्यालयीन वेळेत त्या-त्या ठिकाणी टाकलेल्या मंडपात बसून निदर्शने करत धरणे दिल़े याशिवाय जिल्ह्यात 11 कर्मचारी अधिकारी कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर असल्याने त्यांचा संपातील सहभाग टळला़ नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग आणि संवर्गात 6 हजार 203 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती़ यातील 57 जण हे पूर्वपरवानगीने रजेवर होत़े तर संपात हजार 1 हजार 505 अधिकारी कर्मचा:यांनी सहभाग नोंदवला होता़ शहादा, तळोदा, नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा आणि धडगाव येथील पंचायत समितीत तब्बल 4 हजार 641 अधिकारी व कर्मचारी यांची कामावर हजेरी होती़ 
संपाची माहिती नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे हाल झाल़े 
 

Web Title: Due to the employees' collapse, the government complex of Nandurbar fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.