नंदुरबारात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची अधोगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:03 PM2018-04-27T13:03:28+5:302018-04-27T13:03:28+5:30

कृषी विभागाचा लक्ष्यांक 50 टक्के : दीड हजारपैकी 714 पूर्ण झाल्याचा दावा

Due to the 'farming' he will land in Nandurbar | नंदुरबारात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची अधोगती

नंदुरबारात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची अधोगती

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेची जिल्ह्यात अधोगती सुरू आह़े गेल्या दोन वर्षात शेततळ्यांची महती समजून आलेल्या अडीच हजार शेतक:यांनी अर्ज करूनही त्यातील निम्म्या शेतक:यांची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत़ यातील निम्म्या शेतक:यांना अनुदान अदा करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आह़े 
शेतीक्षेत्रात जलव्यवस्थापनाला महत्त्व देत, कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आह़े मस्त्यव्यवसायाला यातून चालना मिळणार होती़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येत आह़े योजनेसाठी कृषी विभागाकडून तालुकानिहाय, उपविभागस्तर आणि जिल्हास्तरावरून शेतक:यांकडून अर्ज मागवण्यात आले होत़े गेल्या दोन वर्षात 2 हजार 760 शेतक:यांकडून अर्ज मागवण्यात आले होत़े या अर्जानुसार कामकाज करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात केवळ 59 शेततळ्यांची कामे सुरू असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आह़े लाभार्थी शेतक:यांना 15 बाय 15, 20 बाय 20, 20 बाय 25, 30 बाय 25 मीटर या क्षेत्रात खड्डा तयार करून त्यावर 500 मायक्रॉन रिइनफोर्स एडीपीई जिओमेब्रेन प्लॅस्टिक कागद अंथरून जलसाठा करून घ्यावयाचा होता़ यात ब:याच शेतक:यांची कामे सुरू असली तरी कृषी विभागाकडून वेळोवेळी निधी देणे आणि आखणीच्या कामांना दिरंगाई केली जात असल्याने काम अपूर्ण असल्याचा दावा शेतक:यांनी केला आह़े खड्डा केल्यानंतर तपासणीच्या कामात कृषी विभागाकडून वेळखाऊ प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आहेत़ विशेष म्हणजे कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात या योजनेसाठी तीन कोटी रुपयांचा निधी वितरित केला आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी वितरित करूनही कामे अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 
2017-18 या वर्षात नंदुरबार तालुक्यात 51 शेततळ्यांसाठी 22 लाख 68 हजार, नवापूर 46 तळ्यांसाठी 19 लाख 9 हजार, अक्कलकुवा 63 तळ्यांसाठी 17 लाख, शहादा 18 तळ्यांसाठी 9 लाख, तळोदा एका तळ्याला 43 हजार, तर धडगाव तालुक्यात 99 शेततळ्यांसाठी 44 लाख 50 हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आह़े एकूण 278 तळ्यांसाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचे वितरण होऊन यातील किती पूर्ण झाले आहेत याची माहिती संबंधित विभागाकडे नाही़ दोन वर्षापासून सुरू असलेल्या योजनेत कार्यालयीन कामकाजाचा खर्चही करण्यात आला आह़े 2016-17 मध्ये 1 लाख 26 हजार तर 2017-18 मध्ये हा खर्च 2 लाख 20 हजार असा दुप्पट झाला आह़े 
शेतक:यांनी खोदलेल्या खड्डय़ाला क्षेत्रफळानुसार 5 हजार रुपये ते 22 हजार 110 रुपये अनुदान कृषी विभागाकडून देय आह़े विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात धडगाव तालुक्यात 1331 तळ्यांना मान्यता देण्यात आली होती़ यातील काहीच पूर्ण असून उर्वरित शेतळ्याचे काय, असा प्रश्न आह़े 
उदासीन भूमिका शहादा आणि तळोदा तालुक्यातील शेतक:यांची असल्याचे स्पष्ट झाले आह़े यंदाच्या वर्षात तळोदा 1, तर शहादा तालुक्यात 18 जणांच्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आह़े लोकमत ऑनलाईन

उदासीन भूमिका शहादा आणि तळोदा तालुक्यातील शेतक:यांची असल्याचे स्पष्ट झाले आह़े यंदाच्या वर्षात तळोदा 1, तर शहादा तालुक्यात 18 जणांच्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आह़े 

Web Title: Due to the 'farming' he will land in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.