पथराई येथील आगीमुळे संसार पडले उघडय़ावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:12 PM2018-07-15T12:12:05+5:302018-07-15T12:12:10+5:30
आगीत हजारोंचे नुकसान : अधिका:यांकडून पंचनामे, मदतीची अपेक्षा
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे घरांना लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आह़े याबाबत कोरीट मंडळ अधिकारी, तलाठी, उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिका:यांकडून पंचनामे करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आह़े
पथराई येथे गुरुवारी सायंकाळी शांतीलाल दशरथ पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लगतच्या सुमारे चार ते पाच घरांचे मोठे नुकसान झाले होत़े अचानक लागलेल्या आगीमुळे येथील ग्रामस्थांमध्ये एकच धावपळ सुरु झाली होती़
पथराई जवळील निझर, वाका, अंतुली, चिंचोदा येथील ग्रामस्थांनी मदतीला पुढे येत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल़े याच प्रमाणे नंदुरबार व तळोदा येथून अगिAशमन बंबसुध्दा मागविण्यात आला होता़ परंतु वेगवान वारा असल्याने आगीने रुद्र रुप धारण केले होत़े भिषण आगीमुळे येथील ग्रामस्थांचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत़ घरातील फ्रीज, कुलर, टीव्ही, लाकडी साहित्य, शेतीपंप, बॅट:या, मोटरपंप आदी शेती उपयोगी साहित्यांचेही मोठय़ा संख्येने नुकसान झाले आहेत़
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
अचानक आग लागल्याचे पाहून परिसरात एकच धावपळ उडाली़ आग झपाटय़ाने आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने ती आटोक्यात आणताना अनेकांना मोठी कसरत करावी लागली़ आगीत रमण पटेल, अरुण पटेल, चंदू पटेल आदी ग्रामस्थांचे नुकसान झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े
आग लागली त्यावेळी बहुतेक शेतकर शेतीची कामे आटोपून घरी आलेली होती़ दुपारी आग लागली असती तर आग आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळ कमी पडले असत़े त्यामुळे यापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले असत़े असा अंदाज वर्तविण्यात आला आह़े