नवलपूर शिवारात बिबटय़ाच्या पायाचे ठसे आढळल्याने भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:39 PM2019-07-01T12:39:23+5:302019-07-01T12:39:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील अवगे-जुनवणे गावालगत नवलपूर शिवारात जगदीश मगन पाटील यांच्या शेतात रविवारी दुपारी दीड वाजेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील अवगे-जुनवणे गावालगत नवलपूर शिवारात जगदीश मगन पाटील यांच्या शेतात रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बिबटय़ाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने याबाबत वनविभागाच्या अधिका:यांना भ्रमणध्वनीने माहिती देण्यात आली.
शेतक:यांनी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत केली आहे. मात्र महिना लोटूनही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रविवारी दुपारी पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी शेतातून घरी निघाले. दुपारी नवलपूर शिवारात पावसाला सुरुवात झाली. त्याचदरम्यान सुसरी प्रकल्पाला लागून असलेल्या एका शेतात भरदुपारी बिबटय़ाने हजेरी लावल्याने शेतक:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवलपूर शिवारात शेतात बिबटय़ाच्या पायाचे ठसे आढळून आले. हा बिबटय़ा केळीच्या शेतात शिरल्याचे या ठशांवरुन दिसून येते.
याबाबत शेतक:यांनी वनविभागाला भ्रमणध्वनीने माहिती दिली. वनविभागाने या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.