महामार्गामुळे विकासाला मिळेल चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:11 PM2017-08-27T12:11:09+5:302017-08-27T12:11:09+5:30
शेवाळी-नेत्रंग महामार्ग : हालचाली गतिमान, जमिन संपादन लवकरच होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग या जवळपास साडेचारशे किलोमिटर महामार्गाच्या कामासाठे हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच राज्याच्या हद्दीतील रस्त्यासाठी जमिन संपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे सुरत-नागपूर महामार्ग ते गुजरातधील एक्सप्रेसवे जोडले जाणार आहेत.
सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील शेवाळी फाटय़ापासून ते गुजरातमधील नेत्रंग गावार्पयत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील दुर्गम भाग जोडले जावे हा त्यामागचा उद्देश आहे. या महामार्गाला वर्षभरापूर्वी केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली होती. सहा महिन्यापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे. त्याची देखभाल व दुरूस्तीचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फतच सुरू आहे. आता या महामार्गासाठी जमिन संपादनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गावांमध्ये जनसुनवाई घेण्यात येणार आहे.
असा असेल महामार्ग
हा प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
दुर्गम भाग जोडला जाईल
या महामार्गामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह गुजरातमधील दुर्गम भाग देखील जोडला जाणार आहे. दोन्ही राज्यांच्या सिमेवरील हा भाग दुर्गम व आदिवासी समजला जातो. या भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामार्गाचा मोठा उपयोग ठरणार आहे. धुळे येथील एमआयडीसी आणि नंदुरबारातील प्रस्तावीत एमआयडीसीमधील उत्पादीत माल देखील या मार्गाने गुजरात, राजस्थानमार्गे दिल्लीर्पयत पोहचविला जाऊ शकणार आहे. याशिवाय या महामार्गानेच थेट नागपूर, मुंबई आणि सुरत देखील जोडले जाणार असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
जिल्ह्यातून जाणा:या एकुण महामार्गाच्या लांबीनुसार त्या त्या भागात जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत 31 ऑगस्ट रोजी जनसुनवणी देखील आयोजित करण्यात आली आहे. नवीन दरानुसार शेतक:यांना जमिनींचा मोबदला मिळतो किंवा कसा याकडे देखील आता लक्ष लागून आहे