अवकाळी पावसामुळे नंदुरबारातील नदी नाल्यांना आले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:47 PM2018-06-02T12:47:19+5:302018-06-02T12:47:19+5:30
सातपुडय़ात हजेरी : राणीपूर प्रकल्पाच्या साठय़ात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/म्हसावद : धडगाव तालुक्यासह नागङिारी, साबलापाणी, राणीपूर, ता.शहादा या भागात गुरूवारी सायंकाळ व रात्री उशिरा वादळी वा:यासह पाऊस झाल्याने नदीनाले प्रवाहित झाल़े यामुळे राणीपूर धरणाच्या पाणीसाठय़ा वाढ झाली़
गुरूवारी सायंकाळी धडगाव तालुक्यातील काकर्दा व परिसरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता़ या पावसामुळे शहादा तालुक्याकडे जाणा:या नदी नाल्यांना पूर आल्याचे दिसून आल़े दरम्यान पावसाचे पाणी सातपुडय़ातील राणीपूर प्रकल्पात गेल्याने तेथेही साठय़ात वाढ झाली़ या प्रकल्पातून गेल्या दोन महिन्यापासून परिसरातील शेतकरी गाळ घेवून जात असल्याने धरणाची खोली वाढली होती. गेल्या वर्षी वीटा तयार करणा:या व्यावसायिकांनी धरणातून गाळ काढून आर्थिक फायदा करून घेतला होता. मात्र यावर्षी वनक्षेत्रपाल एस.के. खुणे यांनी फक्त शेतकरी वर्गाना परवानगी दिल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले. पहिल्याच पावसात राणीपूर धरण भरल्याने परिसरातील जनतेने गर्दी केली होती.
सातपुडा पर्वतरांगात झालेल्या पावसाचे पाणी नदीनाल्यात आल्याने गारवा निर्माण झाला़ यातून उकाडय़ाने हैराण झालेले शेतकरी आणि ग्रामस्थ सुखावले होत़े सातपुडय़ात गुरूवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने नदी-नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील वातावरणात गारवा जाणवू लागला असून, सुसरी धरणात नदी नाल्यातील पाणी आल्याने पातळीत वाढ झाली आह़े मान्सूनपूर्व पावसाने धडगाव तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने प्रकल्पात साठा वाढला आह़े यंदा सुसरी प्रकल्पातून गाळ काढण्यात आला आह़े यामुळे धरणाची खोली वाढून पाणीसाठवण क्षमता वाढली आह़े मान्सूनपूर्व पावसामुळे प्रकल्पातील खोलीचा अंदाज येणार असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े
धडगाव तालुक्यात शुक्रवारी दुपारी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती आह़े गुरूवारी रात्री उशिरा नर्मदा काठासह वनक्षेत्रात पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आह़े