ग्रामसेवक नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील योजनांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:08 AM2017-12-04T11:08:38+5:302017-12-04T11:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 952 महसूली गावे आणि 595 ग्रामपंचायती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात 111 ग्रामसेवकांची निकड आह़े ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावणा:या ग्रामसेवकांची तब्बल 28 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत़
ग्रामीण भागाचा चौदावा वित्त आयोग, पेसा निधी, रोजगार हमी योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात सुरू आह़े यात ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका आह़े मात्र पूर्वीपासून मंजूर पदांमध्ये वाढ करण्यात आलेली नसल्याने ग्रामविकासाच्या या कार्याला प्रभारीपदाने ‘सुरूंग’ लावला आह़े एकाच ग्रामसेवकावर दोन किंवा त्यापेक्षा अधिकारी गावांची जबाबदारी देण्यात येत असल्याने समस्या वाढत आहेत़ यामुळे अनेक गावांमध्ये राबवण्यात येणा:या योजनांसाठी भरघोस निधी येऊनही विकासकामे रखडली आहेत़