युरिया मिळत नसल्याने नंदुरबारात शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:09 PM2018-07-26T12:09:08+5:302018-07-26T12:09:18+5:30
पहाटेपासून रांगा : ऐनवेळी साठा संपल्याने रांगेत असलेल्या शेतक:यांचा हिरमोड
नंदुरबार : पहाटेपासून रांगा लावूनही ऐनवेळी खत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतक:यांनी नंदुरबारातील अंधारे चौकाजवळ ठिय्या आंदोलन केले. यामुळे या भागात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार व शेतकी संघाच्या पदाधिका:यांनी शेतक:यांची समजूत घातल्यानंतर वाद निवळला. तरीही शेकडो शेतक:यांना खाली हात परतावे लागले. दरम्यान, ट्रक मालकांच्या संपामुळे खतसाठा वेळेवर ुउपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले.
सध्या पीक पाण्याची स्थिती समाधानकारक असल्यामुळे शेतक:यांकडून पिकांना युरियाचा मात्रा देण्यात येत आहे. परिणामी युरियाची मागणीदेखील वाढली आहे. परंतु बाजारात युरियाचा तुटवडा आहे. खाजगी व्यापारी कृत्रीम टंचाई निर्माण करीत आहेत तर शेतकरी सहकारी संघातर्फे मर्यादित वाटप होत आहे. नंदुरबारातील शेतकरी सहकारी संघासमोर दररोज शेतक:यांची लांबलचक रांग लागत आहे.
पहाटेपासून रांग
नंदुरबारातील शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयासमोर पहाटेपासून शेतक:याच्या रांगा लागत आहेत. त्यासाठी शेतकरी आदल्या दिवशी रात्रीच नंदुरबारात मुक्कामी येत आहेत तर काही शेतकरी पहाटेच नंदुरबारात पोहचत आहेत. साठा असल्यास रांगेतून खत मिळते नाहीतर सर्व मेहनत वाया जाते.
ऐनवेळी साठा संपला
बुधवारीदेखील शेतक:यांनी रांगा लावल्या होत्या. शेतकरी सहकारी संघाच्या वेळेनुसार सकाळी खत वाटप सुरू झाले. परंतु रांगेतील 30 ते 35 टक्के शेतक:यांना खत वाटप केल्यानंतर साठा संपल्याचे जाहीर करण्यात आले. नवीन साठा कधी येईल याबाबत काहीही शाश्वती नसल्याचेही जाहीर करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या शेतक:यांनी तेथेच अर्थात अंधारे चौकाजवळ ठिय्या आंदोलन केले. मागणीप्रमाणे युरिया खत मिळालेच पाहिजे यासाठी मागणी करण्यात आली. शेतकरी सहकारी संघाच्या अधिका:यांनी तसेच तहसीलदार गोपाळ पाटील, पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांनी शेतक:यांची समजूत घातली. सध्या ट्रक मालक व चालकांचा संप असल्यामुळे वेळेवर साठा उपलब्ध होत नसल्याचे सांगूनही शेतक:यांचे समाधान होत नव्हते. तासाभरानंतर शेतक:यांनी आश्वासनावर विश्वास ठेवून ठिय्या आंदोलन मागे घेतले.
दहा रुपये अतिरिक्त वसुली
नंदुरबार शेतकरी संघातर्फे युरियाच्या एका बॅगमागे दहा रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. त्यावर शेतकरी संघाच्या अधिका:यांनी यावेळचा रॅक हा दोंडाईचा ऐवजी जळगाव येथे उतरला. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने दहा रुपये अतिरिक्त घेतले जात आहे. यापुढे अतिरिक्त दहा रुपये घेतले जाणार नसल्याचेही यावेळी अधिका:यांनी स्पष्ट केले.
ट्रक मालकांचा संप
ट्रक मालकांच्या संपामुळे खतांचा साठा येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे खत टंचाई काही प्रमाणात निर्माण झाली आहे. संप आणखी काही काळ चालल्यास खत टंचाईचा मोठय़ा प्रमाणावर सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
विक्रेत्यांकडून अडवणूक
खाजगी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतक:यांची युरियासाठी अडवणूक केली जात असल्याचे चित्र आहे. एका युरियाच्या बॅग घेतल्यास एक दाणेदार खताची बॅग घेणे सक्तीचे आहे. त्यामुळे शेतक:यांची अडवणूक होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक विक्रेत्यांनी युरियाचा मोठय़ा प्रमाणावर साठा करून ठेवला आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात एप्रिल ते जुलै दरम्यान एकूण 30 हजार 680 मे.टन युरियाची मागणी करण्यात आली होती. पैकी 22 हजार 358 मे.टन खतसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकूण 75 टक्के पुरवठा झाला असून तीन रॅक लवकरच उपलब्ध होणार आहेत.
डीएपीची 3,530 मे.टन मागणी असतांना 3,372 मे.टन, एमओपीची 7,660 मे.टन मागणी असताना 4,925 मेटन, इफको 1300 मे.टन खत उपलब्ध झाले आहेत.
संयुक्त खतांची 11,707 मे.टन मागणी असताना 11,329 मे.टन उपलब्ध झाले आहे. सिंगल सुपर फॉस्फेटची 13,400 मे.टन मागणी असताना 11,073 मे.टन उपलब्ध झाले आहे.
एकूण जिल्ह्यासाठी सर्व प्रकारच्या खतांची 67 हजार 030 मे.टन मागणी असताना 53,058 मे.टन खत उपलब्ध झाले आहे.