पाण्याअभावी बोरद येथे पीक करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:58 PM2018-05-28T12:58:14+5:302018-05-28T12:58:14+5:30
तापमानाचाही बसतोय फटका : आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 28 : तळोदा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पाण्याअभावी पिक करपू लागली आहेत़ तसेच ऐरवी 25 मेस होणारी कापूस लागवडसुध्दा पाण्याअभावी यंदा उशिरा करण्यात येणार असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात आल़े
तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, आमलाड, प्रतापपूर, खरवड, त:हावद, कढेल, लाखापूर, करड आदी परिसरात भिषण पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आह़े त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांनी कापूस लागवड यंदा उशिरा करण्याचा निर्णय घेतला आह़े सध्या तापमानाचा पारा चांगलाच वर चढला आह़े गेल्या दोन महिन्यांपासून तापमान चाळीशी पार गेल्याने एकीकडे जीवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे पीक जगवताना शेतक:यांना एकना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े
शेतक:यांनी कुपनलिकांमध्ये दोनशे ते अडीचशे फुटांपर्यत सबमर्शिबल पंप सोडले आहेत़ तरीसुध्दा पाहिजे त्या प्रमाणात पाणी ओढले जात नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात कापसाची लागवड 25 मे नंतर होण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येत आह़े
महावितरणकडूनही दररोज केवळ 3 ते 4 तासच कृषिपंपांना वीजपुरवठा पुरविण्यात येत असतो़ त्यातही तो असमान दाबाचा असल्याने शेतक:यांकडून पीकांना पुरेशा प्रमाणात पाणीसुध्दा दिले जात नसल्याचे सांगण्यात आल़े
दरम्यान, रात्रीबेरात्री वीजपुरवठा होत असतो़ त्यामुळे शेतक:यांना आपला जीव धोक्यात टाकून पीकांना पाणी द्यायला जावे लागत असत़े आधीच परिसरात बिबटय़ांचा वावर आह़े त्यातच अवेळी पाणी द्यायला जाताना शेतक:यांच्या अंगावर काटा उभा राहत असतो़
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे पाण्याच्या विवंचनेमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आह़े वाढत्या तापमानामुळे येथील लघुप्रकल्पसुध्दा कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पशुपालकांसमोर समस्या वाढत आह़े पाणी नसल्याने परिसरातील मोजक्या विहिरींमध्ये मोटारी टाकून त्या माध्यमातून पाणी ओढले जात असल्याच्या व्यथा येथील शेतक:यांकडून सांगण्यात येत आहेत़