मान्सूनपूर्व वा:यांमुळे फळपिकांना फटका
By admin | Published: May 30, 2017 12:32 AM2017-05-30T00:32:01+5:302017-05-30T00:32:01+5:30
वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर : केळी, पपई, आंबा पिकांना नुकसानकारक
नंदुरबार : मान्सूनपूर्व वेगवान वारे यंदा वेळेवर येऊन धडकल्याने मान्सूनच्या आगमनाविषयी विविध आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस होईल याबाबतही कृषी तज्ज्ञांकडून दुजोरा दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर एवढा आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रीया जलदस्वरूपात सुरू आहे. वा:यांमुळे केळी, पपई, आंबा व उन्हाळी लागवड होणा:या कापसाला फटका बसत आहे.
यंदाचा उन्हाळा सर्वच अर्थाने तापदायक ठरला होता. एप्रिलच्या दुस:या आठवडय़ापासून तापमान 41 ते 44 अंश सेल्सीयसर्पयत राहिले होते. मध्यंतरी राज्यातील इतर भागात वळवाचा पाऊस झाला, परंतु जिल्ह्यात त्याचा मागमूसही राहिला नाही. त्यामुळे तापमान कमी होत नव्हते. गेल्या दोन आठवडय़ापासून तापमानाचा दिलासा मिळत आहे. 40 अंशाच्या आत तापमान राहत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच वेगवान वारेदेखील वाहत असल्यामुळे तापमानापासून दिलासा मिळाला आहे. सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगवान वारे वाहत आहेत. या वा:यांमुळे अनेकांना हैराण करून सोडले आहे. पिकांनाही त्याचा फटका बसत आहे.
सध्या वाहणारे वारे हे मान्सूनपूर्व वारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ात अशा प्रकारचे वारे वाहत असतात. नैऋत्य दिशेकडून हे वारे वाहत असतात. आताही त्यांची दिशा तीच आहे. साधारणत: यांचा वेग मे महिन्याच्या दुस:या आठवडय़ात प्रतितास दहा ते पंधरा किलोमीटर इतका असतो. मे च्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्यांचा वेग वाढून तो 40 ते 45 किलोमीटर प्रतितास इतका होतो. मान्सून दाखल झाल्यानंतर वा:याचा वेग मंदावतो. परंतु कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास त्याचे स्वरूप चक्रीवादळात होत असते.
गेल्या वर्षाच्या तुलनेत मान्सूनपूर्व वेगवान वारे हे आठवडाभर उशिराने सुरू झाले आहेत. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल अशी अपेक्षा आता जोर धरू लागली आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्याला पुरक बाबी सध्या घडत आहेत.
फळ पिकांना फटका
वेगवान वा:यांमुळे फळ पिकांना फटका बसत आहे. जिल्ह्यात केळी, पपईसोबतच आंब्याचे क्षेत्रदेखील मोठे आहे. केळी व पपईचे झाडे तुटून पडण्याची शक्यता आहे. फळ असल्यास त्यांना भेगा पडणे किंवा तुटून खाली पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आंबेदेखील वा:यामुळे खाली पडून त्यांचे नुकसान होत आहे.
जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या हजारो आंब्यांच्या झाडांपासून निघणा:या उत्पादनावर या भागातील अर्थकारण अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता दोन आठवडे आधीच सुरू झालेल्या मान्सूनपूर्व वा:यांमुळे आंब्याचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय बागायतदार शेतक:यांनी लागवड केलेल्या उन्हाळी कापसालाही या वा:यांमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविल जात आहे.