पावसाचे पाणी फ्यूजपेटय़ांमध्ये शिरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:15 PM2019-07-08T12:15:15+5:302019-07-08T12:15:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वीज वितरण कंपनीने तळोदा शहराला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूजपेटय़ा जमिनीपासून काही अंतरावरच असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वीज वितरण कंपनीने तळोदा शहराला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूजपेटय़ा जमिनीपासून काही अंतरावरच असल्याने पावसाचे पाणी त्यात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फ्यूजपेटय़ा धोकेदायक बनल्या असून संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिका:यांनी दखल घेऊन ह्या पेटय़ा उंचावर बसवाव्यात, अशी शहरवासीयांची मागणी आहे.
तळोदा शहराला सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून गेल्यावर्षी साधारण 17 वाढीव नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. तथापि, काही ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर बसविताना संबंधित ठेकेदाराने जमिनीपासून तीन ते चार फुटावरच फ्यूजपेटय़ा बसविल्या आहेत. विशेषत: नवीन वसाहती, कॉलेज रस्ता, हातोडा रस्त्यावरील ट्रॉन्सफॉर्मरच्या फ्यूजपेटय़ांची अशी अवस्था आहे. सध्या तळोदा शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. सखल भागात हे पाणी मोठय़ा प्रमाणात साचत आहे. शेतशिवारातील पाणी कॉलेज रस्त्यावर प्रचंड प्रमाणात साचते. याठिकाणी तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याचठिकाणी चौफुलीपासून नजीक नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसवला आहे. त्याची फ्यूजपेटी जमिनीपासून अडीच--तीन फुटावरच असल्यामुळे फ्यूजपेटीत केव्हाही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय ती फ्यूजपेटीदेखील उघडी आहे. त्यामुळे अप्रिय घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हा रस्ता महाविद्यालयाकडे जातो. साहजिकच महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात. शिवाय येथे ग्रामीण भागातून येणा:या नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे सध्या धोकेदायक ठरलेल्या या फ्यूजपेटय़ा उंचावर बसविण्याबाबत वीज कंपनीच्या अधिका:यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.