‘नदी गावच्या उशाला पण कोरड ग्रामस्थांच्या घशाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 03:06 PM2019-01-19T15:06:45+5:302019-01-19T15:06:49+5:30

शहादा : तालुक्यातून कधीकाळी खळाळत वाहणारी सुसरी नदी गेल्या काही वर्षात पावसाळ्यात भरुन वाहत नसल्याने काठावरच्या गावांमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी ...

'Due to the rocks of the river but the dry land masses' | ‘नदी गावच्या उशाला पण कोरड ग्रामस्थांच्या घशाला’

‘नदी गावच्या उशाला पण कोरड ग्रामस्थांच्या घशाला’

Next

शहादा : तालुक्यातून कधीकाळी खळाळत वाहणारी सुसरी नदी गेल्या काही वर्षात पावसाळ्यात भरुन वाहत नसल्याने काठावरच्या गावांमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु आह़े ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी गत असलेल्या या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात प्रशासनाही रस घेतल्याने त्यांनी जावे कोठे असा, प्रश्न उपस्थित केला जात आह़े   
महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सिमेवर असलेल्या श्रीखेड आणि उखळसेम या शहादा तालुक्यातील दोन गावांचे विभाजन करणा:या सुसरी नदीत यंदाही पाणी नसल्याने भूजलाची पातळी ही दीड मीटर्पयत खोल गेली आह़े दोन्ही गावांच्या प्रत्येकी दोन पाडय़ांवर पाणीटंचाईमुळे भिषण स्थिती उद्भवली असून महिला आणि पुरुष पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती करत आहेत़ यात सर्वाधिक गंभीर स्थिती श्रीखेडाच्या गावखेडा या नव्या वसाहतीत आह़े श्रीखेड गावापासून उत्तरेला टेकडीवर असलेल्या  पाडय़ार्पयत पाणीपुरवठा करणा:या पाईपलाईन पोहोचू शकत  नसल्याने तेथील महिला दररोज टेकडी उतरुन श्रीखेड शिवारात दीड ते पावणे दोन किलोमीटर्पयत पाणी शोधत हिंडत आहेत़ यात एखाद्या विहिरीत पाणी असले तरी ते सर्वाना पुरेल याची शाश्वती नसल्याने मग पुन्हा दुस:या विहिरींचा शोध घेत त्यांना फिरावे लागत आह़े ऐन उन्हाळ्यात दर दिवशी हीच स्थिती उद्भवत असल्याने येत्या उन्हाळ्यात काय होणार, या प्रश्नानेच त्यांचे चेहरे गंभीर होत आहेत़ प्रशासनाने नव्या वसाहतीच्या सोयीसाठी नवीन बोअर, हातपंप किंवा तात्पुरती पाणी योजना दिल्यास त्यांची समस्या सुटणार आह़े परंतू ही सोय टेकडीवरच व्हावी अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची आह़े 
गावखेडासोबतच उखळसेम आणि श्रीखेड येथेही येत्या दोन महिन्यानंतर पाणीटंचाई भिषण होण्याची चिन्हे आहेत़ दोन्ही गावांची एकच ग्रुप ग्रामपंचायत असल्याने पाणी योजना करण्यात आल्या आहेत़ नदीच्या काठावर आणि नदीच्या पात्रापासून काही फूटावर केलेल्या या पाणी योजनांना आतापासूनच घरघर लागल्याने गावात एक किंवा दोन दिवसाआड सोडल्या जाणा:या पाण्यावरुन लक्षात येत आह़े नव्या टंचाई कृती आराखडय़ात या गावांचा समावेश करुन जलसंधारणाची कामे तसेच सुसरीनदीपात्रात भोरटेक ते श्रीखेड यारदम्यान क़ेटी़वेअर बंधारा बांधण्याची मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत़ साधारण दीड ते पावणेदोन हजार लोकसंख्या असलेल्या श्रीखेडला दोन पाडे आहेत़ त्यातील गावखेडा ही नवी वसाहत म्हणून उदयास येत आह़े याठिकाणी 25 ते 30 घरे आहेत़ श्रीखेड गावासाठी सुसरी नदीपासून काही अंतरावर कूपनलिका करुन ग्रामपंचायत पाणीपुरवठा करत आह़े ही योजना आताच कोरडी झाल्याची माहिती देण्यात येत आह़े येथून गावखेडा पाडय़ार्पयत पाईपलाईन करणे ग्रामपंचायतीला शक्य नसल्याने तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा स्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े गावखेडा येथे नुकतीच वीज पोहोचली आह़े   
4एकीकडे गाव टंचाईच्या झळा सोसत असताना दुसरीकडे शेतशिवार दुष्काळ झळांमध्ये होरपळत आह़े पाणी उपलब्ध नसल्याने गहू उत्पादन हाताचे गेल्याची स्थिती येथे आह़े आगामी काळात ऊस आणि मे महिन्यातील बागायती कापूस लागवडीसाठी पाणी शिल्लक राहणार नसल्याने शेतकरी हक्काच्या उत्पादनाला मुकणार आहेत़ 
 

Web Title: 'Due to the rocks of the river but the dry land masses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.