पाच हप्त्यांच्या वेतन फरकामुळे एसटी कर्मचा:यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:04 AM2018-10-31T11:04:36+5:302018-10-31T11:04:40+5:30

नंदुरबार : दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी कर्मचा:यांना नाममात्र अडीच हजारांचा बोनस मिळणार असला तरी वेतन कराराच्या फरकाच्या पाच हप्त्यांचे वितरण ...

Due to the salary hike of five premiums, ST employees: Diwali sweet | पाच हप्त्यांच्या वेतन फरकामुळे एसटी कर्मचा:यांची दिवाळी गोड

पाच हप्त्यांच्या वेतन फरकामुळे एसटी कर्मचा:यांची दिवाळी गोड

Next

नंदुरबार : दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी कर्मचा:यांना नाममात्र अडीच हजारांचा बोनस मिळणार असला तरी वेतन कराराच्या फरकाच्या पाच हप्त्यांचे वितरण करण्यात येणार असल्याने यंदाची दिवाळी या ना त्या पध्दतीने कर्मचा:यांना गोड माणून घ्यावी लागणार आह़े 
1 एप्रिल 2016 पासून एसटी कर्मचा:यांना नवीन वेतन करार लागू करण्यात आला आह़े तो 31 डिसेंबर 2020 र्पयत कायम राहणार आह़े नवीन वेतन कराराच्या फरकाचे एकूण 48 हप्त्यांमध्ये वितरण करण्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून सांगण्यात आले होत़े त्यानुसार वेतन कराराच्या फरकाचे पहिले पाच हप्ते 1 नोव्हेंबर रोजी कर्मचा:यांना वितरीत करण्यात येणार आह़े संबंधित एसटी कर्मचा:यांचे बेसिक वेतनानुसार हप्ते ठरणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
दरम्यान, यंदाच्या दिवाळीत वेतन कराराच्या फरकाचे पाच हप्ते वितरीत होणार असल्याने एसटी कर्मचा:यांची दिवाळी साजरी होत असली तरी ‘पारंपारिक’ पध्दतीने दरवर्षी मिळणारा अडीच हजारांचा बोनस कर्मचा:यांची घोर निराशा करत आह़े एकीकडे इतर शासकीय कर्मचा:यांना भरभरुन बोनस दिला जात असताना महामंडळातील कर्मचा:यांना आपल्या हातचे राखूनच दिवाळी साजरी करावी लागत असल्याची माहिती आह़े बेसिक वेतन वाढ व अन्य मागण्यांसाठी मागील ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये कर्मचा:यांनी चार दिवसांचा लाक्षणीक संप पुकारला होता़ आतासुध्दा 1 नोव्हेंबर रोजी कर्मचा:यांकडून धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह़े परंतु मागील वर्षी आंदोलनात सहभागी होणा:या कर्मचा:यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे यंदाच्या आंदोलनात किती कर्मचारी सहभागी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े 
दरम्यान, दरवर्षी दिवाळीनिमित्त एसटी कर्मचा:यांना सण-उचल पोटी 10 हजार रुपये देण्यात येत असतात़ नंतर या पैशांची पगारातून वसूली करण्यात येत असत़े परंतु यंदापासून ज्या कर्मचा:यांचे बेसिक वेतन 25 हजारांहून अधिक आहे त्यांना सण-उचल मिळणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आह़े ज्यांचे बेसिक याहून कमी आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आह़े त्यामुळे जर वेतन फरकाचे पाच हप्ते मिळाले नसते तर केवळ अडीच हजारांवरच एसटी कर्मचा:यांना आपली दिवाळी साजरी करावी लागली असती, असे बोलले जात आह़े एकूण 48 हप्त्यांमध्ये वेतन करार फरकाचे वितरण होणार असून पुढील महिन्यात पाच हप्त्यांचे वितरण होणार आह़े उर्वरीत 43 हप्त्यांचेही दर महिन्याप्रमाणे वितरण करण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरु आह़ेदळणवळण व्यवस्थेचे मुख्य साधने म्हणून रेल्वे व एसटी महामंडळाकडे पाहिले जात असत़े केंद्र शासनाचे कर्मचारी असलेल्या रेल्वे कर्मचा:यांना यंदा बोनस म्हणून 78 दिवसांचा पगार शासनाकडून आधीच जाहिर करण्यात आला आह़े सुमारे अडीच महिन्यांचा पगार त्यांना बोनस म्हणून मिळणार आह़े त्यामुळे रेल्वे कर्मचा:यांची दिवाळी जोरात असल्याचे म्हटले जात आह़े त्या तुलनेत एसटी कर्मचा:यांना अगदी तुटपुंजा बोनस मिळत असल्याने केंद्र व निमशासकीय नोकरीतील फरक या ठिकाणी अधोरेखीत होतो़
 

Web Title: Due to the salary hike of five premiums, ST employees: Diwali sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.