संपामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढिग पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:06 PM2020-10-05T13:06:39+5:302020-10-05T13:06:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई ठेकेदाराकडील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिल्याने शहरातील विविध भागात ...

Due to the strike, there were piles of rubbish everywhere | संपामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढिग पडून

संपामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढिग पडून

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सफाई ठेकेदाराकडील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिल्याने शहरातील विविध भागात कचºयाचे ढिग साचले आहे. घरोघरी कचरा संकलन देखील होत नसल्यामुळे नागरिकांना गोळा केलेला कचरा जाळावा लागत आहे. दुसरीकडे बायोवेस्टेज संकलनासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तीनशे ते साडेतीनशे रुपये रोज मिळावा या मागणीवर ठाम आहेत.
नंदुरबार पालिकेने सफाईचा ठेका दिलेल्या सेवा फाऊंडेशनकडील रोजंदारीवर असलेल्या दिडशे सफाई कर्मचाºयांनी पगारवाढ मिळावी यासाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा रविवारी चौथा दिवस होता. पालिकेच्या नियमित असलेल्या १४० कर्मचाºयांवर शहरातील कचरा उचलण्याची कसरत सुरू असली तरी पुर्ण होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. आधीच कोरोनाची भिती त्यात कचरा आणि दुर्गंधीची समस्या यामुळे शहरवासी भितीच्या वातावरणात वावरत आहेत.
दररोज २० टन कचरा
पालिकेतर्फे सफाई ठेकेदाराच्या माध्यमातून दररोज किमान २० टन कचरा उचलला जातो. साधारणत: २० लहान गाड्या, ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा कचरा संकलीत करून तो पालिकेच्या डंपींग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. सध्या कर्मचाºयांच्या संपामुळे यातील ३० ते ४० टक्के कचराच संकलीत होत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहेत.
घरोघरी संकलनही नाही
कचºयाचे घरोघरी संकलन करण्यासाठी किमान २५ वाहने दररोज सकाळी साडेसहा वाजता निघतात. दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत सर्व वसाहतींमधील कचरा संकलीत करून तो डंपींग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. कचरा संकलीत करतांना ओला व सुका कचरा गोळा केला जातो. तो कचरा संकलीत करणाºया वाहनात वेगवेगळा टाकला जातो. यासाठी एका वाहनावर चालक व दोन कर्मचारी अशा दोन किंवा तीन जणांची नियुक्ती असते. त्या त्या भागात फिरून हा कचरा संकलीत केला जातो.
चार दिवसांपासून कचरा संकलीत करणारे वाहनच येत नसल्यामुळे घरात कचरा गोळा करून डस्टबीन देखील ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटूंबांनी आता आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत कचरा जाळून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी अनेक ठिकाणी असे चित्र दिसून आले. ओला कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मात्र अनेक कुटूंबांची कसरत होत असल्याचे दिसून येत आहे.
आजारांची भिती
रस्ते आणि चौकातील कचरा पुर्णपणे उचलला जात नाही आणि घरोघरी कचरा संकलनही होत नसल्यामुळे कचºयाची दुर्गंधी आणि त्यापासून आजारांची भिती व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक भितीच्या वातावरणात वावरत असतांना आता ही समस्या येऊन उभी राहिल्याने नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.
पगारवाढ किती...
ठेकेदाराकडील रोजंदारी असलेल्या १५० कर्मचाºयांना किमान ३०० ते ३५० रुपये रोज मिळावा अशी मागणी आहे. तर ठेकेदार कंपनी आता आहे त्या पगारात २५ ते ३० रुपये वाढ करून देण्याच्या तयारीत आहेत. त्यावर कर्मचारी राजी नसल्याने तिढा सुटत नसल्याचे दिसून येत आहे. चार ते सहा तासाच्या ड्यूटीसाठी कर्मचाºयांना ३०० ते ३५० रुपये रोज देणे कंपनीला परवडणारे नसल्याचे कंपनीचे म्हणने आहे. त्यामुळे आता पालिकेनेच मध्यस्थी करून हा तिढा सोडवावा अशी मागणी कंपनीने केली आहे.
ठेकेदाराकडील सफाई रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न उभा ठाकला आहे. पालिकेचे १४० सफाई कर्मचारी नियमित कामावर आहेत. पालिकेने ठेकेदाराला नोटीसही बजावली आहे. सोमवारी घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरू होणार आहे. कुणी कामाला आडकाठी आणत असेल तर ठेकेदाराला पोलीस संरक्षण घेता येईल. ठेकेदार समन्वयाने तोडगा काढून काम सुरू करेल. नागरिकांना होणाºया त्रासाची कल्पना आहे. परंतु तोडगा निघेपर्यंत नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षीत आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,
नगराध्यक्षा, नंदुरबार.
 

Web Title: Due to the strike, there were piles of rubbish everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.