संपामुळे नंदुरबार बाजारपेठांचे व्यवहार झाले ठप्प
By admin | Published: June 1, 2017 05:53 PM2017-06-01T17:53:46+5:302017-06-01T17:53:46+5:30
जिल्ह्यात सर्वत्र मूक विरोधातून शेतक:यांकडून निषेध
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.1- बळीराजाने पुकारलेल्या ऐतिहासिक संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसभरात एकाही शेतक:यांने माल न पाठवल्याने जिल्ह्यातील भाजीपाला बाजार ओस पडले होत़े यामुळे आडतदार, व्यापारी यांच्या दैनंदिन उत्पन्नात 80 टक्क्याने घट झाली.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बुधवारी झालेल्या भाजीपाल्याची विक्री गुरुवारी सकाळी करण्यात आली़ नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी झालेल्या लिलावातून 45 क्विंटल तर 360 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आह़े दुपारी शहादा आणि नंदुरबार या दोन्ही बाजार समित्यांमधले व्यवहार हे किरकोळ स्वरूपाचे झाल़े राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांनी उग्र निदर्शने न करता, केवळ मूकनिषेध करून संपात सहभाग नोंदवला आह़े दरम्यान संपाची माहिती नसल्याने साक्री तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातील काही शेतकरी हे कांदा आणि भाजीपाला विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झाले होत़े या संपाला भाजीपाला विक्रेता महासंघ आणि आडतदार यांनी पाठिंबा दिल्यानंतर बाजार बंद झाले आहेत़