महिलेच्या सतर्कतेमुळे चोरटे गारद

By admin | Published: January 25, 2017 12:18 AM2017-01-25T00:18:36+5:302017-01-25T00:18:36+5:30

धाडस : जिल्ह्याच्या विविध भागात चोरी केल्याची कबुली

Due to vigilance of the woman thieves guard | महिलेच्या सतर्कतेमुळे चोरटे गारद

महिलेच्या सतर्कतेमुळे चोरटे गारद

Next

नंदुरबार : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसलेल्या दोघांना महिलेने कुलूपबंद करत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना तळोदा शहरात घडली़ महिलेच्या धाडसाचे तळोदा शहरातून कौतुक करण्यात येत आह़े दरम्यान ताब्यात घेतलेले दोघा परप्रांतीय चोरटय़ांनी शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे दागिने लांबवल्याची कबुली दिली आह़े
सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तळोदा येथील दामोदर नगरात राहणा:या ताराबाई बन्सीलाल पवार (40) यांच्या घरी दोघे बिहारी दागिने पॉलिश  करून देतो असे सांगून आल़े या दोघांवर काहीकाळ विश्वास ठेवत त्यांनी दोघांना घरात प्रवेश दिला़ यावेळी दोघांनी ताराबाई यांच्याकडील पैंजण उजळूनही दाखवल़े यामुळे विश्वास बळावलेल्या ताराबाई यांनी सोन्याचे दागिने उजळून देण्याचे निश्चित केल़े त्यासाठी त्यांनी 80 हजार रुपये किमतीच्या बांगडय़ा चोरटय़ांच्या हातात दिल्या़ दोघांनी त्या बांगडय़ा घेत कुकरमधील पाण्यात टाकून पाणी गरम करून आणण्यास सांगितल़े यावेळी मात्र ताराबाई यांना शंका आल्याने त्यांनी कुकर तपासला, त्यात बांगडय़ा दिसून आल्याने त्यांनी घरातच असलेल्या दोघांची कॉलर पकडून बसवले व हिमतीने बाहेर जात दरवाजा बाहेरून बंद केला़ त्यांनी ही बाब जवळपासच्या लोकांना कळवल्याने त्यांनी घटनास्थळी येऊन माहिती जाणून घेतली़
पोलिसांना नागरिकांनी खबर दिल्यानंतर त्यांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतल़े याबाबत ताराबाई पवार यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शहादा येथील ओमशांती नगरात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास किरण नितीश महाले यांच्या घरी एकाने भेट देत दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत प्रवेश केला़ किरण महाले यांनी संबंधितावर विश्वास ठेवत त्याला आठ हजार रुपयांचे सोन्याचे मणी व 10 हजार रुपयांचे इतर सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होत़े दागिने पॉलिश केल्याचा भास निर्माण करत, चोरटा काही वेळाने घराबाहेर पडला़ किरण महाले यांनी दागिने तपासल्यावर ते मिळून आले नाही़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना ही बाब सांगितली व पोलिसात गुन्हा दाखल केला़ किरण महाले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
4तळोदा येथून ताब्यात घेण्यात आलेले दोघे बिहार राज्यातील आहेत़ सत्येंद्र कुमार रघुनाथ भगत (रा़ ह्रदयनगर जि़ पूर्णिया) व सुजितकुमार सुनीलप्रसाद शहा (रा़ भागलपूर) अशी या दोघांची नावे आहेत़ दोघांनी तळोदा तालुका किंवा या आरोपींची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तळोदा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आह़े

Web Title: Due to vigilance of the woman thieves guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.