जलयुक्तमुळे नंदुरबारातील 104 गावे होणार टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:54 PM2018-05-30T12:54:58+5:302018-05-30T12:54:58+5:30

Due to water conservation, 104 villages of Nandurbar will be free from scarcity | जलयुक्तमुळे नंदुरबारातील 104 गावे होणार टंचाईमुक्त

जलयुक्तमुळे नंदुरबारातील 104 गावे होणार टंचाईमुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सहभागातून जलयुक्तची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत़ ही कामे यशस्वीपणे पूर्ण झाल्यास 104 गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होणार असून 2 हजार 234 टीसीएम जलसाठा उपलब्ध होणार आह़े यामुळे भूजल पातळी भरून निघण्यास मदत मिळणार आह़े 
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सध्या नंदुरबार 21, नवापूर 22, अक्कलकुवा 20, शहादा 15, तळोदा 8 तर धडगाव तालुक्यातील 18 गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू आहेत़ लोकसहभागाचा हातभार असलेल्या या कामांना आता वेग आला असून येत्या महिनाभरानंतर ही कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत़ आजअखेरीस 104 पैकी 63 गावांची कामेही 80 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाली आहेत़ तर 39 गावात सुरू असलेली जलयुक्तची कामे 50 टक्के पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े लघु पाटबंधारे जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे जिल्हा परिषद, वनविभाग शहादा, वनविभाग तळोदा, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, भूजल सव्रेक्षण, ग्रामपंचायत आणि खाजगी सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने 104 गावांमध्ये 2 हजार 201 कामांना मान्यता देण्यात आली होती़ यापैकी 1 हजार 198 कामांच्या निविदा काढून त्यासाठी 48 कोटी 39 लाख 52 हजार रूपयांची तरतूद केली गेली होती़ 
निधीमुळे कामांना सुरुवात झाल्यानंतर लोकसहभागाची जोड मिळाली होती़  ग्रामपंचायती व ग्रामस्थ यांचा प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाने 2 हजार 71 कामांचे आदेश केले होत़े गत महिनाभरापासून या कामांना वेग आला आह़े ही कामे पूर्ण झाल्यानंतर सरासरी 550़9 मिलीमीटर पाऊस झाल्यावरही 2002 टीसीएम पाणीसाठा होणार आह़े जागोजागी साठणारे हे पाणी थेट शेतक:यांना वापरता येणार असल्याने सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार आह़े यात विशेष म्हणजे 104 गावांतील ग्रामपंचायतींनी 159 कामे हाती घेतली आहेत़ या कामांची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात आले आह़े कलसाडी ता़ शहादा वगळता सर्व ठिकाणी कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आह़े  31 प्रकारच्या जलयुक्तच्या कामांमुळे जिल्ह्यातील 4 हजार 223 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आह़े एकीकडे शेती आणि भूजल पातळी सुधारण्याची सर्वाधिक शक्यता असताना दुसरीकडे गाळ काढलेल्या तलाव, पाझर तलाव आणि वाहते नाले यांचे खोलीकरण होऊन त्यांना मूळरूप प्राप्त झाले आह़े नंदुरबार तालुक्यातील 21 गावांतील कामांमुळे 9 हजार 670 मीटर तर नवापूर 22 गावांत 400 मीटर, अक्कलकुवा 20 गावात 200 (लोकसहभागातून), शहादा 15 गावातून 1 हजार 860 मीटर, तळोदा 8 गावातून 240 तर धडगाव तालुक्यातील 18 गावशिवारातील नाले व तलाव यांची खोली 3 हजार 384 मीटर झाली आह़े लोकसहभागातून जिल्ह्यात 3 हजार 220 मीटरने नाल्यांची खोली वाढली आह़े
 

Web Title: Due to water conservation, 104 villages of Nandurbar will be free from scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.