पाणीटंचाईमुळे विहिरींचे खोलीकरण करुनही पाणी लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:38 PM2019-02-12T18:38:26+5:302019-02-12T18:38:52+5:30

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील घुली-कोळदेसह लगतच्या परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात ...

 Due to water scarcity, do not even water the wells well | पाणीटंचाईमुळे विहिरींचे खोलीकरण करुनही पाणी लागेना

पाणीटंचाईमुळे विहिरींचे खोलीकरण करुनही पाणी लागेना

Next

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील घुली-कोळदेसह लगतच्या परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आहे़ दोन दिवसात पाण्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यातचा इशारा कोळदे येथील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे़
नंदुरबार तालुक्यातील कोळदेसह खोडसगाव, वरुळ, पळाशी, समशेरपूर, पथराई आदी गावांमध्ये भयंकर पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे़ वाढत्या बाष्पीभवनामुळे आहे, तेवढेही पाणी संपत असल्याने येथील पिक जगवणे ग्रामस्थांना कठीण जात आहेत़ तीव्र पाणीटंचाई असल्याने कोळदे येथील ग्रामस्थांनी दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे़ याबाबत बुधवारी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात येणार आहे़ तसेच दोन दिवसात प्रशासनाने पाणी टंचाई निवारणासाठी योग्य भुमिका न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोळदा येथील उपसरपंच सुभाष राजपूत यांनी दिला आहे़
दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील घुली-कोळदे येथे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामापासून वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़ पपई पिक वाचविण्यासाठी घुली ता़ नंदुरबार येथील शेतकºयांकडून विहिरी खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे़ खोलीकरण करुनही विहिरींना पाणी लागत नसल्याने शेतकºयांचा खोलीकरणावरील खर्चही वाया जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे़ घुली, पळाशी, कोळदे शिवारातील लहान मोठे गावतलाव, बंधारे पाण्याअभावी भरलेच नाहीत़ परिणामी पाण्याची पातळी खालावली असल्याने अनेक शेतकºयांना फटका बसत आहे़ विहिरींनी तळ गाठला असून पाण्यासाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे़ पाण्यासह पशुपालकांना चारा टंचाईची समस्याही सहन करावी लागत आहे़

Web Title:  Due to water scarcity, do not even water the wells well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.