संडे स्पेशल मुलाखत-२७ वर्षांपासून घेतल्या जाताय भुकंपाच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:43 PM2021-01-03T12:43:33+5:302021-01-03T13:21:07+5:30
सावळदा भुकंप मापन केंद्रात आधुनिक उपकरणे सरदार सरोवर निगमचे सावळदा येथील भुकंप मापक केंद्र परिसराच्या दृष्टीने महत्वाचे आहे. शनिवारी बसलेल्या धक्क्याची माहिती लागलीच उपलब्ध होऊ शकली. -दिलीप जाधव.
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
सावळदा येथील भुकंप मापक केंद्रात अत्याधुनिक सिस्मोग्राफ यंत्राद्वारे भुकंपाची नोंद घेतली जाते. १९९३ साली सरदार सरोवर निगम अंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राला थेट गांधीनगर येथील केंद्राला जोडण्यात आले असून तेथून ॲानलाईन डाटा वेबसाईटवर पहाण्यास मिळतो. येथील केंद्रामुळे परिसरातील भुकंपाच्या नोंदी लागलीच आणि अचुक मिळण्यास मदत होत असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख दिलीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
सावळदा केंद्राची स्थापना कधी झाली आणि त्याचे कार्य काय?
सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत १९९३ साली सावळदा येथे भुकंप मापन केंद्र स्थापन करण्यात आले. भौगोलिक संशोधन आणि मापन या पद्धतीनुसार तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार हे केंद्र सावळदा येथे स्थापन करण्यात आले. पूर्वी या केंद्रात भूकंप नोंदणीचे जुने उपकरणे होते. नंतर त्यात अत्याधुनिक यंत्र बसविण्यात आले. हे केंद्र सरदार सरोवर निगम अंतर्गत येते. सरदार सरोवर निगमअंतर्गत गांधीनगर येथील मुख्य केंद्राशी या केंद्राची लिंकींग आहे. या केंद्रात पूर्वी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. परंतु आता ॲानलाईनमुळे येथील काही कर्मचारी गांधीनगर येथे वर्ग करण्यात आले असून आता येथे चार कर्मचारी कार्यरत आहेत.
सिस्मोग्राफ उपकरणाचे कार्य काय असते?
भुकंपाची तीव्रता आणि वेळ याची माहिती नोंद करण्यासाठी या उपकणारचा वापर आता केला जातो. पूर्वी जुन्या पद्धतीने या ठिकाणी भुकंपाची तीव्रता आणि वेळ व स्थान यांची नोंदणी केली जात होती. जमिनीत होणारऱ्या हालचालींची नोंद हे यंत्र घेते. त्यानुसार ग्राफ तयार करून ते उपलब्ध करून देते. त्यामुळे भुकंपाचे केंद्र आणि त्याची तीव्रता लागलीच लक्षात येऊन प्रशासनाला माहिती दिली जाते. याशिवाय गांधीनगर येथील केंद्रातून ॲानलाईन डाटा सर्वत्र उपलब्ध होत असतो. त्यामुळे प्रशासनाला उपाययोजना करणे व जनतेला आवाहन करणे सोयीचे ठरते.
एकुण नऊ केंद्र...
सरदार सरोवर निगम अंतर्गत एकुण नऊ भुकंपमापन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रात एकमेव सावळदा केंद्र आहे. गुजरातमध्ये पाच तर मध्यप्रदेशात तीन केंद्र आहेत. ही सर्व केंद्र गांधीनगर येथील मुख्य केंद्राशी जोडण्यात आले असून ते ॲानलाईन डाटा तयार करते.
अनेक नोंदी...
भुकंपाच्या अनेक नोंदी या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. बारीकसारीक नोंदी देखील होत असतात. परंतु त्याची जाणीव आपल्याला होत नाहीत. दोन किंवा अडीच पेक्षा अधीक रिक्टर स्केलच्या तीव्रवतेचे धक्केच जाणवत असतात. शनिवारी आलेले धक्के हे अडीचपेक्षा अधीक असल्याने ते जाणवले.
७०० कि.मी.ची नोंद...
या केंद्राअंतर्गत ७०० ते ८०० कि.मी.मधील भुकंपाची नोंद घेतली जाते. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील भुकंपांचाही तीव्रता या ठिकाणी नोंदली गेली होती. अर्थात गांधीनगर केंद्र हे मध्यवर्ती असल्याने तेथेच सर्व डाटा तयार होतो.