पूर्व भाग अद्यापही कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:11 PM2017-09-21T12:11:47+5:302017-09-21T12:11:47+5:30
नंदुरबार तालुक्याची स्थिती : लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
शनिमांडळ/लहान शहादे : पावसाळा संपत आला असला तरी अद्याप शनिमांडळ ता़ नंदुरबार येथील लघुप्रकल्पात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतक:यांना रब्बी हंगामाला मुकावे लागते की काय? असा प्रश्न निर्माण होत आह़े
यंदाच्या पावसाळी मौसमात नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व भाग नेहमीप्रमाणे कोरडाच राहिला आह़े परिणामी येथील नद्या-नाले, विहिरी, लघु प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े खान्देशातील काही भाग वगळता सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आह़े परंतु नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व भागाचा घसा यात कोरडाच राहिला आह़े यामुळे बळीराजाची पिकंही धोक्यात आली असल्याने तोही चिंतेतच आह़े
पावसाळा संपल्यात जमा असताना अजूनही येथील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आह़े त्यामुळे रब्बी हंगाम घ्यावा कसा, पिकांसाठी पाणी आणावे कोठून असा प्रश्नांचा भडीमार परिसरातील शेतक:यांकडून करण्यात येत आह़े शनिमांडळ येथील दोन्ही धरणात तीन फुटही पाणी नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े जाणकारांच्या म्हणण्यानुसार रब्बी हंमागासाठी या धरणातील पाणीसाठा साधारणत 25 फुटार्पयत असल्यास संपूर्ण हंगाम पूर्ण क्षमतेने येत असतो़
अशीच परिस्थिती ठाणेपाडा लघु पक्रल्पाचीदेखील आह़े परंतु आता पावसाळा संपण्यात आला असल्याने या लघुप्रकल्पांच्या पाणीसाठय़ात काही भर पडेल अशी आशा मावळत जात आह़े दरम्यान, येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाल्यासच रंब्बी हंगाम तरणार असल्याचेही शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े
लहान शहादे परिसरात कापूस करपला
नंदुरबार तालुक्यातील लहान शहादेसह लगतच्या परिसरात पावसाअभावी शेतक:यांचा कापूस करपू लागला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े खरिप हंगामातील या कापसाला पाणी मिळत नसल्याने तो कोरडा पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े पाऊस नसल्याने या परिसरातील जमिनीलादेखील तळे पडत आहेत़ त्याच प्रमाणे परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहत असल्याकारणाने याचा विपरित परिणाम इतरही पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े