कापसावर पाने खाणा:या अळ्यांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:37 AM2017-08-28T10:37:28+5:302017-08-28T10:37:28+5:30
शेतक:यांकडून उपाययोजना : नंदुरबार तालुक्यातील स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यात लागवड करण्यात आलेल्या कोरड आणि बागायत क्षेत्रातील कापसावर गेल्या काही दिवसांपासून पाने खाणा:या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आह़े यामुळे पिकांना नुकसान होत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
तालुक्यात यंदा 30 हजार हेक्टर कापसाची लागवड करण्यात आली आह़े या कापसाला काही दिवसांपूर्वी बोंडअळीचा धोका निर्माण झाला होता़ यावर शेतक:यांना उपाय करून मात केली होती़ त्यातच गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या वाढ झालेल्या झाडांची पाने अळ्या खात असल्याचे दिसून आले आह़े अळ्या पाने खात असल्याने केवळ बोंड दिसून येत आह़े अनेक ठिकाणी अद्याप बोंड आलेले नाही़ त्यात कापसाची झाडे ही आकाराने लहान आहेत़ अळ्यांचा संचार वाढत असल्याने उत्पादन धोक्यात आले आह़े पानांवर जागोजागी अळ्या आणि खड्डे दिसून येत आहेत़ विखरण, भालेर, कोपर्ली, सातुर्के , बह्याणे, खोंडामळी, कोरीट, कोळदे, शिंदे, लहान शहादे यासह पश्चिम पट्टय़ातील गावामध्ये कापसात अळ्या फोफावत आहेत़ या अळ्या रोखण्यासाठी शेतक:यांना योग्य त्या औषधांची माहिती कृषी विभागाने देण्याची मागणी करण्यात आली आह़े गेल्या दोन दिवसांपासून सकाळी निर्माण होणा:या ढगाळ वातावरणात या अळ्या वाढीस लागत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े येत्या काही दिवसातही वातावरणात बदल होणार असल्याने अळ्यांच्या प्रादुर्भावाची शक्यता आह़े