शहादा येथे ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:10 PM2018-03-21T13:10:03+5:302018-03-21T13:10:03+5:30
विविध शैक्षणिक साहित्याची मांडणी : 19 केंद्रातील प्राथमिक शाळांचा सहभाग
लोकमत ऑनलाईन
शहादा, दि़ 21 : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फर्े शाळा व्यवस्थापन समिती तालुकास्तरीय ह्यशिक्षणाची वारीह्ण हा उपक्रम राबविण्यात आला. शहादा पालिकेच्या म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित या उपक्रमात तालुक्यातील सर्व 19 केंद्रातील प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, या उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. त्यात विद्याथ्र्यानी गाणी, कविता यासह पथनाटय़ सादर केले.
मंगळवारी आयोजित शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन जि.प. सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती दरबारसिंग पवार होते. या वेळी गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, गटशिक्षणाधिकारी अनंतराव पाटील, जि.प. सदस्य सुनील चव्हाण, पं.स. सदस्या सखूबाई शेमळे, विनोद पाडवी, भवरलाल ठाकरे, शिवाजी पवार, उत्तम शेमळे, रमेश चौधरी, जे.एस. पाटील, पी.एस. जाधव, प्रकाश भामरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, डी.डी. राजपूत, एम.एस. बंजारा, डी.टी. वळवी, एम.आर. निकुंभ, सी.एस. निकुम, उषा पेंढारकर, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे आदी उपस्थित होते.
या वेळी अभिजित पाटील म्हणाले की, गुणवत्ता विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली पाहिजे. शिक्षणाच्या वारी उपक्रमात शिक्षकांनी लोकसहभाग आणि पदरमोड करून तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. खाजगी शाळांपेक्षा जि.प.च्या शाळांचा दर्जा सुधारत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक उषा पेंढारकर यांनी केले. तालुक्यातील एकूण 245 शाळांपैकी 228 शाळा डिजीटल झाल्याचे आणि 178 शाळा प्रगत झाल्याची त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अशोक बागले व नरेंद्र महिरे यांनी तर जे.एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.