नंदुरबारातील अंडा बाजाराला तेजीचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:56 AM2017-11-29T11:56:24+5:302017-11-29T11:57:40+5:30
Next
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून अंडय़ांची आवक वाढली आह़े नंदुरबारकर दररोज सुमारे 25 हजार अंडी फस्त करीत असल्याची माहिती आह़े शहरातील होलसेल व्यापा:यांकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात आली़ सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये अंडय़ांना मोठी मागणी आह़े मध्यंतरीच्या काळात मालाची आवक कमी व मागणी वाढल्याने कधी नव्हे ते अंडय़ाचे दर गगनाला भिडले होत़े परंतु गेल्या काही दिवसांपासून अंडय़ाचे दर स्थिर असल्याची माहिती अंडय़ांचे होलसेल व्यापारी पिंजारी जैनुल महोम्मद शफी यांनी दिली़ परंतु काही दिवसांपूर्वी अंडय़ांचे दर वाढले असल्याने याचा खवैय्यांवर तिळमात्रही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितल़े होलसेल अंडी व्यापा:यांकडून सध्या साडेपाच रुपये दराने प्रती अंडय़ाची विक्री करण्यात येत आह़े मागील महिन्यात अंडय़ांचे होलसेल भाव हे सहा रुपयांर्पयत पोहचले होत़े परंतु त्यानंतर मालाची समाधानकारक आवक झाल्याने हे दर पुन्हा कमी होऊन साडेपाच रुपयांवर आले आह़े अंडय़ांची झालेली भाववाढीमुळे सर्वसामान्यांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अंडी विक्रेत्यांकडूनही नफ्या व्यतिरिक्त जादा दराने अंडी विकण्यात येत असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आह़े नंदुरबार शहराला जिल्ह्यातील विविध पोल्ट्री फार्मकडून अंडय़ांची आवक होत असत़े यात, दोंडाईचा रोड, धानोरा, नवापूर आदी ठिकाणच्या पोल्ट्री फार्मकडून अंडय़ांची आवक होत असत़े