आठ लाखांची अवैध दारू पोलिसांकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 11:58 AM2019-12-08T11:58:17+5:302019-12-08T11:58:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी १५ दिवसाच्या आत सलग तिसऱ्यांदा अवैध मद्यसाठा जप्तीची कारवाई केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिसांनी १५ दिवसाच्या आत सलग तिसऱ्यांदा अवैध मद्यसाठा जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार हे सहकाºयांसह मोलगी ते धडगाव रस्त्यावर गस्त घालत असतांना धडगावहून मोलगीकडे अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याची गुप्तवार्ता मिळाली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार व अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पगार यांनी फौजदार पी.पी. सोनवणे, पो.कॉ.रवींद्र कुवर, पो.नाईक गुलाब वसावे, पो.कॉ. दीपक वारूळे, पो,कॉ. बापू शेमळे, पो.कॉ. सतिष तावरे, पो.कॉ.देवानंद कोळी, पो.कॉ. अमोल शिरसाठ, पो.कॉ.सगुन थोरे, पो.कॉ.पिंटू पावरा, महिला पोलीस कॉ.मंगला पावरा यांच्यासह भगदरी फाट्या जवळ सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास जीप क्रमांक एमएच ०४- एफजे-६८६७ ला अडवून तपासणी केला असता या जीपमध्ये मध्यप्रदेश बनावटीची टँगो व बिअरचे बॉक्स आढळून आले असता वाहनचालक संजय कागडा पाडवी रा.कुंडलचा पाटीलपाडा यास ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत जीपसह आठ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पी.पी. सोनवणे करीत आहे.