दुचाकी चोरट्यास आठ महिने सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:11 PM2019-12-06T12:11:58+5:302019-12-06T12:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकी चोरट्यास शहादा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आठ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शिरूड, ता.शहादा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुचाकी चोरट्यास शहादा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आठ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
शिरूड, ता.शहादा येथील सुरेश पुना पाटील यांच्या घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी १६ एप्रिल २०१९ रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती. शहादा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वसंत मान्या पावरा, रा. वाघपाडा, ता.शिरपूर हा चोर असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यास अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचे दोषारोपपत्र हवालदार सादिक शेख यांनी न्यायालयात सादर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.आर.शेंडगे याच्यासमोर हा खटला चालला. वसंत पावरा याच्याविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने त्यास न्यायालयाने आठ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.जी.एम.बागुल यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हर्षल रोकडे , आतिक सैय्यद होते.
उर्दू विकास परिषदेतर्फे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय उर्दु भाषा विकास परिषदेतर्फे उर्दु भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी अक्कलकुवा तालुक्यात १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत व नंदुरबार तालुक्यात १७ डिसेंबर रोजी उर्दु भाषेतील पुस्तकांचे फिरते प्रदर्शन व विक्री होणार आहे. या प्रदर्शनाचा वाचकांनी लाभ घ्यावा असे, राष्ट्रीय उर्दु भाषा विकास परिषदेचे संचालक, अकील अहमद यांनी कळविले आहे.