नंदुरबारात दोन गटातील मारहाणीत आठ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:03 PM2018-12-03T13:03:12+5:302018-12-03T13:03:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरासमोर वाहन उभे केल्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत आठजण जखमी झाले. हाणामारीत दोन्ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरासमोर वाहन उभे केल्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत आठजण जखमी झाले. हाणामारीत दोन्ही गटांनी तलवार, लोखंडी सळई व लाठय़ाकाठय़ांचा वापर करण्यात आला. नंदुरबारातील घोडापीर मोहल्ला भागात शनिवारी रात्री ही घटना घडली. याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, शेख मुस्तकीन सलीम कुरेशी व सिराऊद्दीन शेख हलवाई यांच्यात घरासमोर वाहन लावण्याच्या वादातून रविवारी रात्री वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. दोन्ही गटातर्फे तलवार, लोखंडी सळई, काठय़ांचा वापर करण्यात आला. त्यात दोनजण जखमी झाले. याबाबत रात्री उशीरा शहर पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
शेख मुस्तकीन सलीम कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरासमोर वाहन लावण्याचा वाद उकरून काढत जमावाने शेख मुजम्मील शेख कलीम व इततर दोघांवर हल्ला केला. त्यात कलीमसह आणखी एकजण जखमी झाला. शेख मुस्तकीन सलीम कुरेशी यांच्या फिर्यादीवरून सिराऊद्दीन शेख हलवाई, रफियोद्दीन बिस्मिल्ला हलवाई, अरमान हलवाई, फारूख रफियोद्दीन हलवाई, हारून रशिद हलवाई, राजू रफियोद्दीन हलवाई, शाहरूख रफियोद्दीन हलवाई, सहाबुद्दीन हलवाई, साजिद सिराज हलवाई, करीम रहिमोद्दीन हलवाई सर्व रा.घोडापीर मोहल्ला यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद सिराजोद्दीन रहिमोद्दीन हलवाई यांनी दिली. अंगणात वाहन लावण्याच्या वादातूनच जमावाने अचानक हल्ला करून मारहाण केली. त्यात सिराजोद्दीन रहिमोद्दीन हलवाई, फारूखशेख हलवाई, साजिद हलवाई, शाहबुद्दीन हलवाई, रफियोद्दीन हलवाई, साबीरा बी हलवाई सर्व रा.घोडापीर मोहल्ला हे जखमी झाले.
याबाबत सिराजोद्दीन रहिमोद्दीन हलवाई यांनी फिर्याद दिल्याने तला जाकीर कुरेशी, तन्वीर सलीम कुरेशी, हमजा सलीम कुरेशी, मुस्तकीन सलीम कुरेशी, मज्जू शेख कुरेशी, जुबेर सलीम कुरेशी सर्व रा.घोडापीर मोहल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी राजू रफियोद्दीन हलवाई, हमजा सलिम कुरेशी, तल्हा जाकीर हुसेन कुरेशी, मुस्तकीन शेख कुरेशी यांना अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक इनामदार करीत आहेत.