एकलव्य निवासी शाळेचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:07 PM2019-08-30T12:07:56+5:302019-08-30T12:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकलव्य निवासी शाळेचा पाणी पुरवठा पालिकेने थांबविल्याने विद्याथ्र्याची हाल होत आहे. पालिकेने पुर्ववत पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकलव्य निवासी शाळेचा पाणी पुरवठा पालिकेने थांबविल्याने विद्याथ्र्याची हाल होत आहे. पालिकेने पुर्ववत पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी होत आहे. पालिकेने शाळेला मिटरने पाणीपुरवठा केल्याचे समजते.
25 दिवसांपासून या शाळेचा पाणीपुरवठा बंद आहे. या शाळेत 800 पेक्षा अधीक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलानजीक असलेल्या शाळेत राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
भर पावसाळ्यात एक दिवस या शाळेतील कर्मचा:याने पाण्याचा पंप काही तास सुरूच ठेवल्याने साक्री नाक्या जवळील वस्तीमध्ये राहणा:या नागरिकांना पाणी मिळाले नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु एका शिपायाच्या चुकीमुळे विद्याथ्र्यांना वेठीस धरले जात असल्याचे विद्याथ्र्यांचे म्हणणे आहे.
यासोबतच एका दिवसात आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही पायी चालत जिल्हाधिका:यांना निवेदन द्यायला जाणार असल्याचे विद्याथ्र्यांनी सांगितले.