शहादा तालुक्यात सहा ग्रा.पं बिनविरोध तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीत निवडणूक ; ४४९ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:14 PM2021-01-05T12:14:09+5:302021-01-05T12:14:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात माघारीच्या अंतिम मुदतीत वैध ठरलेल्या ६४८ पैकी १९९ अर्ज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात माघारीच्या अंतिम मुदतीत वैध ठरलेल्या ६४८ पैकी १९९ अर्ज मागे घेतले गेले. यातून ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९९ अर्ज माघारीसोबत सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी तहसील कार्यालयात माघारीच्या अंतिम मुदतीत तालुक्यातील दोंदवाडे, नांदरखेडा, वर्ढेतर्फे शहादा, बामखेडातर्फे सारंगखेडा, हिंगणी व न्यू असलोद या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीत १० जणांनी माघार घेतल्याने १८, कोठलीतर्फे सारंगखेडा ग्रामपंचायतीसाठी १५ अर्ज बाद झाल्याने १९, कुऱ्हावद तर्फे सारंगखेडा येथे ५ जणांनी माघार घेतल्याने १२, कवठळतर्फे सारंगखेडा येथे ६ अर्ज मागे घेतले गेल्याने ९, तोरखेडा येथे ९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने २४ जण उमेदवारी रिंगणात आहेत. शेल्टी येथे १४ जणांनी माघार घेतल्याने १६, टेेंभे तर्फे सारंगखेडा येथील ९ जणांनी माघार घेतल्याने १५, बामखेडातर्फे तऱ्हाडी येथे ६ जणांनी माघार घेतल्याने २२, फेस येथे ४ जणांनी माघार घेतल्याने १५, पुसनद येथे १२ जणांनी माघार घेतल्याने १९, सोनवदतर्फे शहादा येथे ४ जणांनी माघार घेतल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत. कानडीतर्फे शहादा ग्रामपंचायतीसाठी ११ अर्ज दाखल केले होते, एकानेही माघार न घेतल्याने सर्व ११ उमेदवार रिंगणात आहेत. मनरद ग्रामपंचायतीसाठी दाखल १८ अर्जांपैकी एकाने माघार घेतल्याने १७ उमेदवार, डामरखेडा ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ६ अर्ज माघारी घेतल्याने २२, कोटबांधणी ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ५ अर्ज माघारी घेतल्याने १७, राणीपूर ग्रामपंचायतीच्या दाखल अर्जांपैकी २ अर्ज माघारी घेतल्याने ३१, नागझिरी ग्रामपंचायतीत आठ अर्ज माघारी घेतल्याने १२ तर असलोद ग्रामपंचायतीसाठी दाखल ४४ अर्जांपैकी १४ अर्ज माघारी घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात आहेत.
सारंगखेडा येथे ३६ उमेदवार रिंगणात
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांमधील १७ सदस्यपदाच्या जागांसाठी दाखल अर्जांपैकी ७२ अर्ज वैध ठरले होते. यातील ३६ अर्ज माघारी घेतले गेल्याने ३६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी निवडणुकीची रंगत उत्तरोत्तर वाढत असून, ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तालुक्यातील दुसरी चर्चित ग्रामपंचायत म्हणून मोहिदेतर्फे शहादा ग्रामपंचायतीचा उल्लेख होत होता. या ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ४१ अर्ज वैध ठरले होते. दरम्यान, सोमवारी १० जणांनी माघार घेतल्याने ३१ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक सर्वच प्रकारे चुरशीची ठरणार आहे.