निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:40 PM2020-01-05T12:40:22+5:302020-01-05T12:40:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी रविवार, ५ रोजी रात्री दहा ...

 Election campaign guns will cool today | निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी रविवार, ५ रोजी रात्री दहा वाजता थांबणार आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये प्रचारासाठी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय नेते व उमेदवार प्रयत्नशील आहेत. शेवटच्या दिवशी अर्थात रविवारी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ३१ डिसेंबर रोजी माघारीनंतर प्रचाराला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ५६ गट व ११२ गणात गेल्या सहा दिवसात मोठ्या प्रमाणावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. प्रचार सभा, रॅली, घरोघरी मतदारांच्या भेटी आणि ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचाराची रंगत वाढविण्यात आली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी यांनी प्रचार सभा घेवून निवडणूक प्रचंड चुरशीची केली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा आता रविवार हा शेवटचा दिवस आहे.
रात्री दहा पर्यंत परवाणगी
शेवटच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुदत राहणार आहे. रात्री दहानंतर सोमवारी पुर्ण दिवस जाहीर प्रचार करता येणार नाही. मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देखील घेता येणार नाहीत. त्यामुळे रविवार हा संपुर्ण दिवस उमेदवार व राजकीय नेत्यांसाठी महत्वाचा राहणार आहे.
आयोगाच्या नियमानुसार...
प्रचारासाठीच्या विविध परवाणग्या या तहसील कार्यालयात एक खिडकी योजनेतच देण्यात आल्या. प्रचारासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद गटासाठी चार लाख तर पंचायत समिती गणासाठी तीन लाखांची मर्यादा ठेवण्यात आली होती. अर्ज माघारीच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत खर्च सादर करावा लागणार आहे.
मतदानासंदर्भात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून मतदारांना माहिती देखील देण्यात आली. त्यासाठी डमी मतदान यंत्र बनवून त्यावर केवळ त्याच उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव व चिन्ह टाकून त्याचे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात आले. प्रचारात केवळ दहा वाहनांची परवाणगी देण्यात आली होती. त्यात तीन चारचाकी वाहनांचा समावेश होता.

प्रचार काळात आचारसंहिता भंगाची एकही तक्रार दाखल झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. आता शेवटचे दोन दिवस हे निवडणुकीच्या काळातील महत्त्वाचे आहेत. या काळात निवडणूक विभाग, प्रशासन यांनाही सतर्क राहावे लागणार आहे. नुकतीच नंदुरबार तालुक्यातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी बैठक घेण्यात आली. त्यात आचारसंहितेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title:  Election campaign guns will cool today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.