पॅनल प्रमुखाचे गुणगान गात सुरू झाला निवडणूक प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:38+5:302021-01-13T05:22:38+5:30

शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. परंतु माघारीनंतर सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी ...

The election campaign started singing the praises of the panel chief | पॅनल प्रमुखाचे गुणगान गात सुरू झाला निवडणूक प्रचार

पॅनल प्रमुखाचे गुणगान गात सुरू झाला निवडणूक प्रचार

Next

शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. परंतु माघारीनंतर सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत सर्वाधिक दुरंगी लढती आहेत. अनेक वर्षे एक हाती ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवणा-या गाव पातळीवरील नेत्यांना मात्र या निवडणुकीत स्थानिक नागरिकांकडून चांगलेच आव्हान दिले जात आहे. काही गावांमध्ये तर पारंपरिक विरोधक एकत्र येऊन तिसऱ्या गटाला आव्हान देत आहेत. गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी मत द्या, असा धिंडोराही पिटला जात आहे. गावातीलच काही दिग्गज निवडणुकीपासून दोन हात लांब राहत पडद्यामागून आपले सूत्र हलवत असल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुणांच्या भरणा जास्त आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस पाहावयास मिळत आहे.

सोशल मीडियाचा आधार...

दरम्यान यंदा सोशल मीडियाचा आधार घेत गाव पातळीवर विविध व्हाॅट्स ॲप ग्रुप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आमचा नेता लय पाॅवरफुल, सरपंच पदाचे दावेदार, फक्त गावाच्या विकासासाठी मत द्या आदींसह विविध रिमिक्स गाण्यांचे व्हिडिओ क्लिप टाकून मतदारांना आकर्षित केले जात आहे.

Web Title: The election campaign started singing the praises of the panel chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.