मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतीत निवडणूका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:34 AM2020-11-22T11:34:10+5:302020-11-22T11:34:25+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपणा-या जिल्ह्यातील ४९ आणि मार्च महिन्यात ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपणा-या जिल्ह्यातील ४९ आणि मार्च महिन्यात स्थगित करण्यात आलेल्या ३८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम लागू होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या १० डिसेंबरपर्यंत अंतिम करुन सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये धडगाव तालुक्यातील १६, नवापूर १४, शहादा ५ तर तळोदा तालुक्यातील ३ ग्रामपंचातयींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. राज्यात स्थिती सामान्य होत असल्याने या स्थगित केलेल्या निवडणूका थेट न घेता त्यांचाही मतदार याद्यांचा कार्यक्रम घेण्याचे आयोगाने ठरवले आहे. दरम्यान जिल्ह्यात ते डिसेंबर या काळात मुदत संपणा-या एकूण ४९ ग्रामपंचायती आहेत. यात अक्कलकुवा एक, नंदुरबार २२, शहादा २२ तर तळोदा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये एक डिसेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांचे प्रकाशन होणार आहे. एक ते सात डिसेंबर या काळात हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर १० डिसेंबर रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर लागलीच ग्रामपंचायतींचे निवडणूक वेळापत्रक घोषित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाकडून कामकाजाला गती देण्यात आल्याची माहिती आहे.