नंदुरबार पालिका निवडणुकीत ‘विकास’ला मिळते साथ की ‘परिवर्तन’ची धरली जाते कास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:05 PM2017-12-12T12:05:49+5:302017-12-12T12:09:34+5:30

In the elections of Nandurbar municipality, the 'change' is being held with 'development'! | नंदुरबार पालिका निवडणुकीत ‘विकास’ला मिळते साथ की ‘परिवर्तन’ची धरली जाते कास!

नंदुरबार पालिका निवडणुकीत ‘विकास’ला मिळते साथ की ‘परिवर्तन’ची धरली जाते कास!

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  पालिकेच्या आतार्पयतच्या निवडणुकांमधील सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रचाराची कुठलीही कसर सोडली नाही. सुरुवातीला ‘विकास’वरून नंतर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर आलेला प्रचार पहाता मतदार ‘विकास’ला साथ देतात की ‘परिवर्तन’ची कास धरतात  हे मतदान यंत्रणातून 14 रोजी कळणारच आहे.  
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीची  पालिकेच्या इतिहासातील ही चौथी निवडणूक आहे. यापूर्वीच्या निवडणुकांचा ट्रेण्ड वेगळा होता. या निवडणुकीचा ट्रेण्ड पुर्णत: बदलेला आहे. भाजप काँग्रेसपुढे आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरली. प्रचाराचा कल आणि त्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरले. सुरुवातीपासूनच थेट मतदारांर्पयत पोहचण्याचा प्रय}ात दोन्ही पक्षांनी कुठलीही कसर सोडली नाही. आता मतदार राजा कुणाकडून कल देतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे विद्यमान नगराध्यक्षा र}ा चंद्रकांत रघुवंशी व भाजपतर्फे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष व दोन अपक्ष देखील नशीब अजमावत आहेत. नगरसेवकपदाच्या 39 जागांसाठी देखील दोन्ही पक्षांनी तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रय} केला आहे.
निवडणुकीत सुरुवातीच्या काळात प्रचाराचा मुद्दा केवळ विकासाभोवतीच फिरत होता. त्यानंतर प्रचाराच्या मधल्या टप्प्यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार्पयत प्रचार आला. शेवटच्या टप्प्यात मात्र वैयक्तिक आणि कौटूंबिक आरोप-प्रत्यारोपांर्पयत प्रचार येवून ठेपला. यामुळे मतदारांचे मनोरंजन तर झालेच, परंतु प्रचाराची ही पातळी सुज्ञ मतदारांना रुचली नसल्याचेही चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.
काँग्रेसचा विकासावर जोर
काँग्रेसने प्रचारात शहराच्या विकासावर सर्वाधिक भर दिला. आतार्पयत केलेला विकास आणि शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यात आलेले यश हे मतदारांच्या मनात बिंबविण्याचा प्रय} झाला.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनात थेट एलईडी स्क्रीन, कला पथक, वासुदेव, कव्वाली पथक यांचा समावेश करण्यात आला होता. मोठय़ा नेत्यांच्या सभा घेण्याचे टाळले. केवळ माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एकमेव सभा घेण्यात आली. कॉर्नर सभांच्या माध्यमातून स्वत: रघुवंशी यांनी मतदारांर्पयत आपले विचार आणि भुमिका पोहचविण्याचा प्रय} केला. काँग्रेसला राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने पाठींबा दिला आहे तर समाजवादी पार्टीने देखील पाठींबा दिल्याने काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
भाजपतर्फे परिवर्तनाचे आवाहन
भाजपतर्फे प्रचारात सर्वाधिक परिवर्तनावर जोर देण्यात आला. सत्ताधारींविरोधातील विविध मुद्दे त्यांच्या प्रचार सभांमधून मांडण्यात आले. शिवाय कुठल्या कामांचे नियोजन आहे ते पटवून देण्याचा प्रय} झाला.
भाजपकडे प्रचारकांची फौज होती. खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष चौधरी, स्वत: उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष     विजय चौधरी, हिरालाल चौधरी आदींचा समावेश होता. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेमुळे भाजपच्या आशा वाढल्या आहेत. दुसरीकडे भाजपची जुनी फळी व नेते प्रचारात कुठेही दिसले नाहीत. पक्षातर्फेही कला पथक, वासुदेव, एलईडी स्क्रिन आणि तीनचाकी रिक्षांचा वापर केला. 
सेनेचेही प्रय}
काँग्रेससोबत युती केलेल्या शिवसेनेने आपल्या पाच जागांवरील उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील मोठय़ा प्रमाणावर प्रय} केला. पक्षाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांची सभा आयोजित केली होती. जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या आई स्वत: उमेवार असल्यामुळे सेनेच्या लढतींकडेही लक्ष लागून आहे.
इतर पक्षांचे अस्तीत्व
निवडणुकीत एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्षांसह अपक्ष देखील काही जागांवर रिंगणात आहेत. एमआयएमचा प्रचार त्यांच्या प्रभाव क्षेत्रात दिसून आला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांनी वैयक्तीक प्रचारावर भर दिला. तर काही अपक्षांनी देखील आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रय}   केला. त्यातील दोन प्रभागातील अपक्ष उमेदवार काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांसमोर डोकेदुखी ठरणार आहेत.
एकुणच यंदाची पालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रय} करीत आहे तर भाजपन पहिल्यांदाच पालिकेवर ङोंडा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. ‘विकास’ आणि ‘परिवर्तन’ या मुद्यांवर लढविण्यात आलेल्या निवडणुकीत मतदारराजा कुणाच्या बाजुने कौल देतो याकडे आता शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. 
 

Web Title: In the elections of Nandurbar municipality, the 'change' is being held with 'development'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.