नंदुरबार पालिका निवडणुकीत आजी-माजी सदस्य रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:59 AM2017-11-29T11:59:12+5:302017-11-29T11:59:19+5:30

In the elections of Nandurbar municipality, the grand-East members are in the fray | नंदुरबार पालिका निवडणुकीत आजी-माजी सदस्य रिंगणात

नंदुरबार पालिका निवडणुकीत आजी-माजी सदस्य रिंगणात

googlenewsNext
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगराध्यक्षांसह 11 विद्यमान सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यात दहा काँग्रेसपक्षातर्फे तर एक सदस्य भाजपतर्फे उमेदवारी करीत आहेत. याशिवाय दोघांपैकी एका सदस्याने प}ीला तर एकाने प}ीऐवजी स्वत:कडे उमेदवारी घेतली आहे. दरम्यान, यंदा आजी-माजी एकुण 23 नगरसेवक यंदा निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे. अर्थात माघारीअंती चित्र स्पष्ट होणार आहे.नंदुरबार पालिकेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्यामुळे दोन्ही पक्षांतर्फे निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांनाच तिकिटे देण्यात आली आहेत. त्यासाठी काही प्रभागात जवळच्या कार्यकर्ते किंवा नेत्यांची नाराजीही संबधित नेत्यांना ओढवून घ्यावी लागली आहे. आता माघारीर्पयत अशा नेत्यांची मनधरणी किंवा त्यांचे रुसवे-फुगवे काढावे लागत आहेत. माघारीअंती चित्र स्पष्ट होणार असले तरी पक्षातर्फे देण्यात आलेल्या ए.बी.फॉर्मच्या आधारे काँग्रेस व भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.काँग्रेसतर्फे सर्वाधिककाँग्रेसतर्फे विद्यमान व माजी नगरसेवक किंवा त्यांच्या पत्नी अथवा पतीला उमेदवारी देण्याकडे पक्षाचा कल राहिला आहे. चालू पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचे 37 पैकी 36 नगरसेवक होते. त्यातील एका नगरसेवकाने भाजपकडून उमेदवारी मिळविली आहे. इतर दहा जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी करणा:या विद्यमान सदस्यांमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी, नगरसेवक कश्मिरा बोरसे, किरण रघुवंशी, कुणाल वसावे, दिपक दिघे, परवेजखान करामतखान, शिलाबाई रमेश कडोसे, राजेंद्र माळी, भारती अशोक राजपूत, कलावती वरत्या पाडवी, संजय चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय रवींद्र मराठे यांच्याऐवजी त्यांच्या प}ी सुरेखा मराठे तर वंदना पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पती कैलास पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी नगरसेवकांचा देखील मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. भाजपने देखील दिली उमेदवारीभाजपतर्फे देखील अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने देखील अत्यंत सावध पवित्रा घेत उमेदवारांची निवड केली आहे. त्यात विद्यमान सदस्य ईश्वर जयराम चौधरी, माजी नगरसेवक श्याम मराठे, चारुदत्त कळवणकर आदींचा समावेश आहे. याशिवाय निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांचा शोध घेवून त्यांना उमेदवारी देण्याकडे कल आहे. माघारीअंती सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.अपक्षांचीही उमेदवारीयंदा अपक्षांचीही मोठय़ा प्रमाणावर उमेदवारी राहण्याची शक्यता आहे. माघारीर्पयत कोण रिंगणात बाहेर पडतो त्यावर देखील बरेच काही अवलंबून राहणार आहे. नगराध्यक्षपदासाठी चार अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय नगरसेवकपदासाठी देखील मोठय़ा प्रमाणावर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.माघारीकडे लक्षशनिवारी दाखल अर्जाची छाननी केल्यानंतर सोमवारपासून अर्ज माघारीस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज माघारी झाली नाही. मंगळवारी मात्र, नंदुरबारसह तळोदा व नवापूरात देखील उमेदवारांनी माघार घेतली. ज्या प्रभागात अपक्षांची डोकेदुखी आहे अशा प्रभागातील संबधीत उमेदवारांना माघार घेण्यासाठी विविध माध्यमांचा अवलंब केला जात आहे. माघारीच्या अंतिम दिवशी अर्थात 30 रोजी त्यातील कितीजण माघार घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.

Web Title: In the elections of Nandurbar municipality, the grand-East members are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.