प्रतापपूर परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:37 PM2018-04-09T12:37:14+5:302018-04-09T12:37:14+5:30

महावितरणचे दुर्लक्ष : सबस्टेशनवरील अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी

Electric scatter in Pratappur area | प्रतापपूर परिसरात विजेचा लपंडाव

प्रतापपूर परिसरात विजेचा लपंडाव

Next

भारतसिंग गिरासे । 
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 9 : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील वीज वितरण कंपनीच्या 33/11 क़ेव्ही़ सबस्टेशनवर वाढीव विद्युत भार जाणवत आह़े त्यामुळे याला जोडून असणा:या मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमध्ये वीजेचा सतत लपंडाव सुरु असतो़ त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आह़े 
नवीन कार्यान्वित करण्यात आलेले तलावडी व मोरवड या सबस्टेशनवर काही रोहित्रांचा भार टाकून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी प्रतापपूर परिसरातील ग्रामस्थांकडून होत आह़े
प्रतापपूर विद्युत सबस्टेशनअंतर्गत प्रतापपूर, रांझणी, राणीपुर, रोझवा, प्रतापपूर या गावांचा समावेश होत असतो़ विद्युत वितरणचे सहा फिडर कार्यान्वित असून पैकी, प्रतापपूर व रोझवा हे दोन फिडर क्षमतेपेक्षा अधिक वीज भार सहन करीत असल्याची माहिती आह़े त्यामुळे हे दोन्ही फिडर कुचकामी ठरत असतात़ परिणामी भारनियमनाव्यतिरिक्त तासन्तास वीज गुल होत  असत़े आधिच परिसरात मोठय़ा प्रमाणात तापमान जाणवू लागले आह़े 
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आह़े शेतामध्ये ऊस, केळी, पपई, टरबूज, मका आदी पिकाला पाणी देणे कसरतीचे ठरत आह़े वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे  ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 
तळोदा तालुक्यातील बोरद, सोमावल, प्रतापपूर, तळोदा या सबस्टेशन वरील अतिरिक्त विद्युत दाबामुळे शासनाकडे आमदार उदेसिंग पाडवी यांच्या प्रयत्नाने मोदलपाडा, तलावडी, मोरवड हे सबस्टेशन मंजूर करुन कार्यान्वित करण्यात आले होत़े तसेच बोरद सबस्टेशन येथे 5 एम़व्ही़ क्षमतेचा एक वाढीव विद्युत रोहित्रसुध्दा कार्यान्वित करण्यात आला होता़ मात्र प्रतापपूर येथील सबस्टेशन वरील ताण कमी करण्यात आलेला नाही़ त्यामुळे परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’ आह़े नवीन सबस्टेशनवर इतर गावांच्या वीजेचा भार टाकत वीज पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आह़े 
प्रतापपूर सबस्टेशवरुन सातपुडय़ाच्या पर्वत रांगावरील गावांना 15 ते 20 किलामीटर र्पयत वीजवाहिन्या पुरविण्यात येत असतात़ या अतिरिक्त ताणामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारीसह जनमित्रांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत़े तरी संबंधित अधिका:यांनी त्वरीत वीज व्यवस्था सुरळीत करुन शेतक:यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रतापपूर परिसरातील नागरिकांनी केली आह़े अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आह़े
 

Web Title: Electric scatter in Pratappur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.