विद्युत उपकरणे सुरक्षीत हाताळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:12 PM2019-08-30T12:12:57+5:302019-08-30T12:13:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्युत उपकरणे हाताळतांना गणेश मंडळांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ...

Electrical appliances should be handled securely | विद्युत उपकरणे सुरक्षीत हाताळावी

विद्युत उपकरणे सुरक्षीत हाताळावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्युत उपकरणे हाताळतांना गणेश मंडळांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरिक्षक एच.एन.गांगुर्डे यांनी केले आहे. 
गणेशोत्सवात असुरक्षित वीज संच मांडणीमुळे विद्युत धक्का लागून अपघात घडतात. अशा घटना टाळण्यासासाठी विजेचा सुरक्षित वापर करावा व प्रामुख्याने गणपती मंडळांनी तसेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. यासाठी गणपती मंडळांनी लघु दाब अथवा उच्चदाब वाहिनीच्या खाली किंवा बाजूस अगदी जवळ मंडपाची उभारणी करु नये. मंडपासाठी विजेच्या खांबाचा आधार घेवू नये. विद्युत संच मांडणीची उभारणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडून करुन घेण्यात यावी. सजावटीसाठी विद्युत रोषणाई केली असल्यास ती जमिनीपासून किमान 2.7 मीटर उंच असावी. तसेच लोखंडी स्ट्रर असल्यास त्यास आर्थिगसोबत जोडावे. जोड भारानुसार वायर वापरण्यात याव्यात व एमसीबी बसविण्यात यावा. मान्यताप्राप्त पध्दतीने आर्थिग करण्यात यावी व अर्थ लिकेजपासून सुरक्षेसाठी आरसीसीबी बसविण्यात यावा. अनधिकृतपणे हुक टाकून विजेचा वापर करु नये. घरातील सजावटीसाठी विद्युत रोषणाई केली असल्यास ती सहजासहजी लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. एमसीबी, आरसीसीबी यांची तपासणी परवानाधारक व्यक्तींकडून करुन घ्यावी. आयएसआय प्रमाणित उपकरणे वापरावीत. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.    
 

Web Title: Electrical appliances should be handled securely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.