जिल्ह्यातील 1 लाख ग्राहकांकडे 21 कोटी रुपयांचे वीजबिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:30 PM2019-09-25T12:30:52+5:302019-09-25T12:31:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहिम उघडली आह़े मोहिमेंतर्गत वीज बिल थकवणा:या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहिम उघडली आह़े मोहिमेंतर्गत वीज बिल थकवणा:या ग्राहकांवर कारवाई करण्यात सुरु आह़े एकूण 1 लाख ग्राहकांकडे 21 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आह़े
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील थकीत विज बिलाचा आकडा हा वाढत गेल्याने कंपनीकडून वसुली मोहिम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होत़े यानुसार गत 15 दिवसांपासून शहादा आणि नंदुरबार या दोन्ही विभागात संयुक्तपणे वसुली मोहिम सुरु करण्यात आली आह़े मोहिमेंतर्गत कंपनीचे अभियंता आणि कर्मचारी यांची पथके घरोघरी वीज मीटर आणि बिलांची तपासणी करुन कारवाई करत आहेत़
जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 720 ग्राहकांकडे 21 कोटी 10 लाख रुपयांची थकबाकी असल्याने कंपनीकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची कारवाई होत आह़े यापूर्वी थकबाकीदार असलेल्या 54 हजार ग्राहकांनी 7 कोटी 13 लाख रुपयांचा भरणा केला होता़ यामुळे सध्या सुरु असलेल्या मोहिमेला यश येणार असल्याचे अधिका:यांचे म्हणणे आह़े तूर्तास नंदुरबार शहरातील 265 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कंपनीकडून थकीत बिलापोटी ‘कट’ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक विज थकबाकीदारांवर संपूर्ण वसुली होईर्पयत ही कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान एकीकडे ही कारवाई सुरु असताना ग्राहकांकडून वेळेवर वीज बिल न मिळणे, सरासरी वीज बिल देण्याच्या तक्रारी सुरु आहेत़ या तक्रारींचे निरसन न करताच कंपनीकडून वसुली मोहीम हाती घेतली गेल्याने ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली आह़े कंपनीने अनेकांच्या घरी लावलेले वीज मीटर बदलून देण्याची मागणी करुनही कारवाई न झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आह़े